Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात मध्यरात्री कोयत्यांचा थरार; एरंडवणेतील रेस्टोबारवर टोळक्याचा हल्ला, ग्राहकांमध्ये भीतीचा माहोल

पुण्यात एरंडवणे परिसरातील अनंत रेस्टोबारवर मध्यरात्री ४–५ जणांच्या टोळक्याने कोयते व दांडक्यांसह हल्ला केला. ग्राहकांना धमकावून फोडतोड व रोख रक्कम लंपास करण्यात आली. सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 20, 2025 | 11:38 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • मध्यरात्री कोयत्यांनी सशस्त्र टोळक्याचा रेस्टोबारवर हल्ला
  • ग्राहकांना धमकावून फोडतोड आणि रोख रक्कम लंपास
  • सीसीटीव्हीत आरोपींची स्पष्ट दृश्ये; पोलिस तपास सुरू
पुणे: पुणे शहरातून अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहे. हत्या, चोरी, दहशत माजवणे, मारहाण, अत्याचार अश्या अनेक घटना आपल्याला दैनंदिन जीवनात ऐकायला मिळतात. या गुन्हेगारी कृत्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता घरातून पडायचं की नाही असा प्रश्न पडला आहे. आता पुन्हा एकदा दहशत माजवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. एरंडवणे परिसरात रात्री दीडच्या सुमारास अनंत रेस्टोबारवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवला. या टोळक्याच्या हातात कोयते आणि दांडके होते. सशस्त्र असलेल्या या गुंडांनी परिसरात दहशत माजवत रेस्टोबारमध्ये हैदोस घातला. यावेळी त्यांनी बारमध्ये असलेल्या लोकांना धमकावलं. त्यांना शस्त्र दाखवली. ऐवढेच नाही तर फोडतोड ही केली. अचानक झालेल्या या हल्ल्याने तिथे उपस्थित असलेले ग्राहक हादरून गेले.

Uttarpradesh Crime: मैत्री, प्रेम आणि खून; १७ वर्षीय अल्पयीनीची हत्या करून बागेत पुरला मृतदेह, घटनास्थळी बॅग, सिंदूर…

या टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवत बारमधील काही रक्कम लंपास केली. घटना घटनास्थळावरून किती रक्कम पळवली गेली किंवा इतर काही ऐवज चोरीला गेला आहे का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती पोलीसांनी दिलेली नाही.डेक्कन पोलीस स्टेशनचे अधिकारी सकाळपासून घटनास्थळाची पाहणी करून संपूर्ण माहिती गोळा करत आहेत. या घटनेचं सीसीटीव्ही समोर आले आहे.

सीसीटीव्हीत काय?

एक व्यक्ती पहिल्यांदा बारमध्ये शिरतांना दिसत आहे. त्या मागोमाग त्याचे सहकारी बारमध्ये घुसले. या सर्वांनी कोयते आपल्या सोबत ठेवले होते. आत गेल्यानंतर त्यांनी कोयता बाहेर काढला. त्यानंतर उपस्थित असलेली ग्राहक घाबरले. काय करावे हे त्यांना समजले नाहीत. ते गुंड त्यांना धमकावत होते. तोडफोड करत होते. सर्वच जण या अचानक झालेल्या हल्ल्याने घाबरले होते. त्याचा फायदा घेवून या गुंडांनी तिथे असलेली रोख रक्कम लांबवली आहे.

या घटनेमुळे व्यवसाय करायचा की नाही असा प्रश्नही निर्माण झाला आहे. शिवाय बार किंवा हॉटेलमध्ये जायचे की नाही असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. पण पोलीसांच्या नाकावर टिच्चून अशा घटना पुण्या सारख्या शहरात होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनातही भीतीचे वातावरण आहे.

Delhi Crime: मराठी दहावीच्या विद्यार्थ्याची मेट्रोवरून उडी; सुसाईड नोटमध्ये शिक्षकांच्या छळाचा थरकाप उडवणारा आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: हल्ला कुठे झाला?

    Ans: एरंडवणे

  • Que: आरोपी काय घेऊन आले होते?

    Ans: कोयते

  • Que: पुरावा कोणत्या माध्यमातून मिळाला?

    Ans: सीसीटीव्ही

Web Title: Pune crime midnight terror in pune gang attacks restobar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Bihar Crime: मायेचं नातं रक्ताने माखलं! आईने विषारी गहू खाऊ घालून दोन चिमुकल्यांना मारलं, बिहार येथील घटना
1

Bihar Crime: मायेचं नातं रक्ताने माखलं! आईने विषारी गहू खाऊ घालून दोन चिमुकल्यांना मारलं, बिहार येथील घटना

Nashik News : जावयाने सासूला 20 लाखांचा घातला गंडा असं हवंय, मुलगी-नातवाचीही साथ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
2

Nashik News : जावयाने सासूला 20 लाखांचा घातला गंडा असं हवंय, मुलगी-नातवाचीही साथ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Jaipur Accident: जयपूरमध्ये भरधाव ऑडीचा कहर; डिव्हायडरला धडकून पादचाऱ्यांवर घुसली कार, एकाचा मृत्यू, 16 जखमी
3

Jaipur Accident: जयपूरमध्ये भरधाव ऑडीचा कहर; डिव्हायडरला धडकून पादचाऱ्यांवर घुसली कार, एकाचा मृत्यू, 16 जखमी

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral
4

हे फक्त पुण्यातच घडू शकते! बाल्कनीत अडकलेल्या मुलाचा भन्नाट जुगाड; मदतीसाठी थेट ‘Blinkit’वर दिली ऑर्डर अन्…, घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.