Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैत्रिणीवरून वाद, मित्राच्या मानेवर वार करून खुनाचा प्रयत्न; आरोपीला सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

मित्राच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी आणि पन्नास हजार रुपये दंड ठोठावला आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरविले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 24, 2026 | 11:40 AM
मैत्रिणीवरून वाद, मित्राच्या मानेवर वार करून खुनाचा प्रयत्न; आरोपीला सुनावली 'ही' मोठी शिक्षा

मैत्रिणीवरून वाद, मित्राच्या मानेवर वार करून खुनाचा प्रयत्न; आरोपीला सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Follow Us
Follow Us:
  • मैत्रिणीवरून झालेल्या वादातून मित्राच्या खुनाचा प्रयत्न
  • मानेवर धारदार शस्त्राने वार; रिक्षाचालकामुळे वाचला जीव
  • आरोपी किरण थोरातला सुनावली मोठी शिक्षा
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता मित्राच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी आणि पन्नास हजार रुपये दंड ठोठावला आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरविले आहे.

 

किरण शिवाजी थोरात (वय २८, रा. भोसरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर अभिषेक कांबळे याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. सदर गुन्ह्याची घटना १ जानेवारी २०२१ रोजी भोसरी येथे घडली होती. घटनेच्या आधी एक महिन्यापुर्वीच आरोपी आणि जखमी यांची ओळख एका मैत्रिणीच्या माध्यमातून झाली होती. त्या मैत्रिणीबद्दलच्या वादातून मनात राग धरत किरणने फोन करून अभिषेकला बोलावून घेतले. दोघे भोसरीतील टेल्को रोडवर दुचाकीवरून जात होते. किरणने गाडी थांबवायला लावली. गाडी थांबताच त्याने अभिषेकचे डोके पकडून त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला. जवळपासचे लोक येताच किरणने पळ काढला. एका रिक्षाचालकाने अभिषेकला लगेच रुग्णालयात नेल्याने त्याचा जीव वाचला होता. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती.

हे सुद्धा वाचा : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवे वळण, पोलिसांना आला ‘हा’ मोठा संशय; कसून तपास सुरु

या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने प्रेमकुमार अगरवाल यांनी बाजू मांडली. आरोपी स्वतःसोबत धारदार शस्त्र घेऊन आला होता, यावरून त्याने मारण्याची पूर्ण तयारी केली होती. तसेच, गळ्यासारख्या नाजूक भागावर वार केल्याने त्याचा हेतू अभिषेकचा खून करण्याचाच होता असा सरकार पक्षाचा दावा न्यायालयाने ग्राह्य मानला. अभिषेकला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाले नसते, तर त्याचा मृत्यू झाला असता, अशी डॉक्टरांनी दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीचे नुकतेच लग्न झाले असून त्याची पत्नी गरोदर असल्याने शिक्षा कमी करावी, अशी विनंती बचाव पक्षाकडून करण्यात आली. मात्र, गुन्ह्याचे स्वरूप गंभीर होते. त्यामुळे न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.

हे सुद्धा वाचा : इथेनॉल खरेदी बंदीने साखर उद्योग संकटात; हर्षवर्धन पाटलांची केंद्र सरकारकडे मोठी मागणी

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीला किती शिक्षा सुनावण्यात आली?

    Ans: मित्राच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी किरण शिवाजी थोरात याला सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ५० हजार रुपये दंड ठोठावला.

  • Que: मित्राच्या खुनाचा प्रयत्न करण्यामागचे कारण काय होते?

    Ans: आरोपी किरण थोरात आणि जखमी अभिषेक कांबळे यांची ओळख एका मैत्रिणीच्या माध्यमातून झाली होती. संबंधित मैत्रिणीवरून झालेल्या वादातून आरोपीने मनात राग धरून अभिषेकच्या खुनाचा प्रयत्न केला.

  • Que: अभिषेक कांबळे याच्यावर हल्ला कसा करण्यात आला?

    Ans: १ जानेवारी २०२१ रोजी भोसरीतील टेल्को रोडवर दुचाकीवरून जात असताना आरोपीने गाडी थांबवली आणि अभिषेकच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला. एका रिक्षाचालकाने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचा जीव वाचला.

Web Title: The court has handed down a severe sentence to an individual who attempted to murder a young man nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 11:39 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar Murder case: मुळशीत कट रचला; SIT च्या हाती लागले मोठे धागेदोरे
1

Pradeep Purnekar Murder case: मुळशीत कट रचला; SIT च्या हाती लागले मोठे धागेदोरे

Rana Suryavanshi: राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला मोठं वळण! व्हीव्हीआयपी सुरक्षेसाठी रचला कट?
2

Rana Suryavanshi: राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला मोठं वळण! व्हीव्हीआयपी सुरक्षेसाठी रचला कट?

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi:  MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड

Pune News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा
4

Pune News : राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवं वळण! भिगवण, मांजरी अन् पुणे कनेक्शनची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.