
Pune Crime, Navi Mumbai, Ambegaon Police, Firing Case
२४ ऑक्टोबरच्या मध्यरात्री आर्थिक वादातून गोळीबार
गोळीबारात फिर्यादी गंभीर जखमी
तळोजा पोलीस ठाण्यात BNS व Arms Act नुसार गुन्हा
Taloja Firing Case: नवी मुंबईतील तळोजा येथे आर्थिक व्यवहाराच्या वादातून एका व्यक्तीवर पिस्तुलातून गोळीबार (Crime News) करून त्याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी तीन आरोपींना पुण्यातील कात्रज परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. आंबेगाव पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.
२४ ऑक्टोबर रोजी रात्री १.१७ वाजण्याच्या सुमारास तळोजा फेज-२ येथील शिवाजी चौकाजवळ मारवा बिल्डिंगच्या खाली ही घटना घडली. आर्थिक व्यवहाराच्या वादातून आरोपींनी फिर्यादीला मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करून गंभीर जखमी केले. तसेच त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमांनुसार २४ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपी पुण्यातील दत्तनगर परिसरात असल्याची माहिती आंबेगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे आणि सचिन गाडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पथकासह संबंधित ठिकाणी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले.
Five Former CMs Rejoin Congress: पाच माजी मुख्यमंत्री पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर; SIR विरोधातील लढा
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये रुद्र दादासाहेब बारवकर (१९), अनिकेत प्रताप नरवडे (१९) आणि सौरभ गोरख चौधरी (२४) यांचा समावेश आहे. बारवकर आणि चौधरी हे कात्रजमधील संतोषनगर परिसरातील रहिवासी आहेत, तर नरवडे हा शिरूर तालुक्यातील खंडाळे गावचा रहिवासी आहे. तिन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Kalyan Crime: शहरात रिक्षा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाई सुरू असतानाच, महात्मा फुले पोलिसांनी रिक्षा चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. सागर राठोड असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीच्या तीन रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. (Kalyan Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणमधील नेतिवली परिसरात राहणारा सागर राठोड हा नशेच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. नशा करण्यासाठी पैशांची गरज भासत असल्याने तो रिक्षा चोरी करत असल्याचे तपासात समोर आले आहे.
Ans: पुण्यातील आंबेगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने कात्रज परिसरातील दत्तनगर येथून तीन आरोपींना ताब्यात घेतले.
Ans: २४ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १.१७ वाजण्याच्या सुमारास आर्थिक व्यवहाराच्या वादातून तळोजा फेज-२ येथे आरोपींनी एका व्यक्तीवर गोळीबार केला.
Ans: नवी मुंबईतील तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) आणि हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे.