crime (फोटो सौजन्य : social media)
पुण्यातील पुणे रेलवे स्थानकाबाहेर असणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर एका माथेफिरूने कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली असून यावेळी रेल्वे स्थानकाच्या परिसरात अनेक प्रवासी होते. प्रवाश्यांनी हे पाहिल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि या माथेफिरुला अटक केली. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सूरज शुक्ला असे आहे.
Beed Crime : सावकारी जाचाचा कंटाळा, एकाने उचलले टोकाचे पाऊल; सुसाईड नोटमध्ये ‘राजकीय’ खुलासा..
नेमकं काय घडलं?
पुणे रेल्वे स्थानकाबाहेर महात्मा गांधीजींचा पुतळा आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास केशरी रंगाचा कुर्ता घालून एक तरुण आला आणि तो पुतळा असलेला चौथऱ्यावर चढला आणि त्याने पुतळ्यावर कोयत्याने वार करायला सुरुवात केली. यावेळी याठिकाणी अनेक प्रवासी होते. हा प्रकार प्रवाशांनी पाहिल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांना पाचारण केले. सुरज शुक्ल याने पोलीस येई पर्यंत पुतळ्याच्या छातीवर आणि पायावर कोयत्याने वार केले होते. त्याला गांधीजींचा डोकं कोयत्याने तोड्याचे होते. मात्र त्यापूर्वीच सूरजला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले.
प्राथमिक माहितीनुसार, या माथेफिरूचा नाव सुरज शुक्ला असे आहे. सुरज मूळचा उत्तर प्रदेश येथील वाराणसीच्या आहे. तो नोकरीसाठी पुण्यात आला होता. सुरज रुद्राक्षांच्या माळा आणि धार्मिक पुस्तकं विकण्याचे काम करतो. उत्तर प्रदेशातील कुंभमेळा संपल्यानंतर तो महाराष्ट्रात मुक्कामाला आला होता. काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील वाईत तो वास्तव्याला होता. त्याने अलीकडेच शहाळं फोडण्यासाठी कोयता विकत घेतला होता. तो वाईतून पुण्यात आला आणि त्याने पुतळ्यावर कोयत्याने वार केले. सुरज शुक्ला याच्या मनात महात्मा गांधी यांच्याबद्दल पूर्वीपासूनच द्वेष होता. हा द्वेष रविवारी रात्री उफाळून आला.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी आणि तपासणी सुरु आहे. सुरज शुक्ल त्याने हे कृत्य का केले? यासह अनेक प्रश्नांचा तपास सुरु आहे. पोलिसांकडून सुरज शुक्ल याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याची अधिक चौकशी केली जाईल.