दौंड: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना रात्री उशिरा रस्त्यात अडवून त्यांना लुटण्यात आलं होत, आणि त्यांच्या सोबतच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली होती.आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन नराधमांना अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस या नराधमांच्या शोध घेत होते. या दोघांना अटक करण्यात यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अमीर पठाण आणि विकास सातपुते असे आहे. आज दोन्ही आरोपींना बारामतीतील कोर्टात हजार करण्यात येणार आहे.
नेमकं काय घडलं होत?
पुणे सोलापूर महामार्गावरून चारचाकी वाहनाने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी सोमवारी (दि. 30 जून 2025) पहाटे साडे चारच्या सुमारास एक कुटुंब जात होते. त्यावेळी दौड तालुक्यात चिंचोली परिसरात चहा पिण्यासाठी ते थांबले. चहा घेतल्यानंतर सर्वजण पुन्हा कारमध्ये बसत होते. त्याचवेळी दोन अज्ञात हल्लेखोर त्याठिकाणी दुचाकीवर आले. .त्यांनी सगळ्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. यानंतर आरोपींनी महिलांच्या अंगावरील दीड लाखांचे दागिने लुटले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी एका अल्पवयीन मुलीच्या गळ्याला कोयता लावून तिला फरपटत परिसरातील टपरी शेजारी असलेल्या नाल्याजवळील झाडीत नेलं. याठिकाणी दोघांनीही १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
पोलिसांनी या दोन नराधमांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात आहे. आज दोन्ही आरोपींना बारामतीतील कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची कसून शोध घेण्यात येत होता. पोलिसांना या दोन्ही नराधमांना अटक करण्यात यश आले आहे.
Beed Crime : सावकारी जाचाचा कंटाळा, एकाने उचलले टोकाचे पाऊल; सुसाईड नोटमध्ये ‘राजकीय’ खुलासा..