crime (फोटो सौजन्य: social media)
पुण्यातील कोथरूड पोलीस ठाण्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. कोथरूड पोलीस ठाण्यात तीन मुलींना जातीवाचक शब्द वापरून मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आल्याचा समोर आला आहे. कोथरूड पोलीस ठाण्यातील रिमांड रूममध्ये पोलिसांनी तीन मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया.
नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगरची एक मुलगी सासरच्या त्रासाला कंटाळून या तीन मुलींकडे एक दिवसासाठी राहायला गेली होती. ती तरुणी हरवल्याची तक्रार ही संभाजीनगरमध्ये केली होती. पोलीस या मुलीचा मोबाईल ट्रॅक करत कोथरुडपर्यंत पोहोचले. त्यावेळी या संभाजीनगरच्या मुलीचं लोकेशन कोथरुडमध्ये आढळलं. त्यांनी या तीन मुलींच्या फ्लॅटवर जाऊन चौकशी केली. यानंतर पोलिसांनी या तिघींना ताब्यात घेऊन कोथरूड पोलीस ठाण्यात नेले. येथील रिमांड रूममध्ये पोलिसांनी या तिन्ही मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कोथरुड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रेमा पाटील आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कामटे यांनी या तिन्ही मुलींना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप झाला आहे. यातील श्वेता एस या मुलीने फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करत हा सगळा प्रकार सविस्तरपणे सांगितला आहे. पोलिसांनी या मुलींच्या चारित्र्याबद्दल अपमानजनक शब्द वापरले, तसेच तोकड्या कपड्यांवरुन वाईटसाईट बोलले, असा आरोप श्वेता एस हिने केला आहे. पीएसआय कामटे यांनी एका मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि चुकीचा स्पर्श केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या तिन्ही मुली पुण्यात नोकरी करतात, कोथरुड परिसरात राहतात. पोलीस सगळे मिसिंग केसची चौकशी या मुलींकडे करत होते. त्यांना कोणत्याही पद्धतीची मारहाण झाली नाही. तपासाचा भाग म्हणून काही प्रश्न विचारल्याचं कोथरुड पोलिसांनी सांगितलं आहे.
फेसबुक पोस्टमध्ये काय?
सोशल मीडियावर श्वेता एस व्ही या मुलीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत श्वेता एस या मुलीने या तीन मुलींसोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला आहे. तिने म्हटले की, काल रात्री छत्रपती संभाजीनगरमधील एका केसचा तपास करण्यासाठी तेथील पोलीस कोथरुडमध्ये आले होते. त्यांनी तीन दलित मुलींना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. त्यांना चौकशीसाठी नेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या तिघींना कोथरुड पोलीस ठाण्यातील वरच्या मजल्यावर असणाऱ्या रिमांड रुममध्ये पाच तास ठेवण्यात आले. दरम्यानच्या काळात पोलिसांनी त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला.
कोथरुड पोलीस ठाण्यातील पीएसआय प्रेमा पाटील या मुलींना म्हणाल्या की, तुम्ही महार-मांगाचे ना, मग तुम्ही असचं वागणार आहे, तुम्ही वाया जाणार आहात. तुमची जात अशीच आहे, तू किती पोरांसोबत झोपल#$स, तू रां# आहेस, असे प्रेमा पाटील यांनी म्हटल्याचा आरोप आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगरचे पीएसआय कामटे यांनीही मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे. एका मुलीने पोलिसांना उत्तर द्यायचा प्रयत्न केल्यावर पीएसआय कामटे संतापले. या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच कामटे यांनी मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. तुमच्या दोन्ही मैत्रिणींचे स्कार्फ सेम आहेत, मग तुम्ही लेस्बियन आहात का? तुम्ही दोघीही दिसताही तशाच. तुम्ही किती तोकडे कपडे घालता. तुम्ही रां# आहात का? तुम्ही दारु पीत भटकत असाल. तुला बाप नाही तर तुला तर सोडूनच दिलं असेल, असे कामटे यांनी म्हटल्याचा आरोप आहे.
यावर एका मुलीने आमचं ऐकून घ्या अशी विनवणी केली. तेव्हा कामटे यांनी म्हटले की, तू अशीच वागलीस तर एक दिवस तुझा खून होईल. उद्या तुम्हाला नोकरीसाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल, तुमच्यासारख्या मुलींना आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही. आम्ही तुमचं करिअर बरबाद करु, अशी धमकी पीएसआय कामटेंनी मुलींना दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी हायप्रोफाईल केसचं प्रेशर आहे दाखवून या मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ गेला. यासाठी पोलिसांनी माफी मागितली पाहिजे. अन्यथा आम्ही हे प्रकरण लावून धरु, अशी मागणी श्वेता एस या तरुणीने केली आहे.
Nashik Accident: भीषण अपघात! वयोवृद्ध महिलेला ट्रकने चिरडले, जागीच मृत्यू