नाशिमधील सातपूर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका खाजगी क्लासमध्ये बेंचवर बसण्यावरून वाद झाला होता या वादातून दोन अल्पवयीन मित्रांनीच मारहाण करून हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. यशराज गांगुर्डे असे मृत मुलाचे नाव आहे. तो दहावीत आहे. त्याच्याच क्लासमधील दोन अल्पवयीन मित्रांनीच मारहाण करून त्याची हत्या केल्याचे धक्कदायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
नोकरीच्या आमिषाने तब्बल 6 लाखांची फसवणूक; टेलिग्राम अॅपवर ‘ती’ जाहिरात पाहिली अन्…
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी यशराज आणि क्लासमधील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये केवळ बेंचवर बसण्याच्या कारणावरून वाद झाला होता. हा वाद तिथेच थांबला नाही. याच वादातून क्लासच्या आवारात तिघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि यशराजला दोघांनी मिळून बेदम मारहाण केली. दोन्ही अल्पवयीन मित्रांनी यशराजला लाथाबुक्क्यांनी आणि हाताच्या चापट्यांनी जबरदस्त मारहाण केली. ही मारहाण एवढी भयंकर होती की यशराज जागीच कोसळला. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन तपास सुरु केला आहे. ही घटना घडताच सातपूर परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर हादरलं! किरकोळ वादातून 30 वर्षीय युवकाची हत्या
उल्हासनगरमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. किरकोळ कारणातून ३० वर्षीय युवकाची धारदार शास्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. उल्हासनगरमधील कॅम्प 1 येथील साईबाबा मंदिर परिसरात ही घटना घडली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीच नाव साजिद शेख असं आहे. याप्रकरणी दोन आरोपीना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपी फरार आहेत. याप्रकरणी पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
नेमकं काय घडलं?
१ ऑगस्ट रोजी सायंकाळी साजिद शेख आणि रोहित पासी यांची भेट झाली होतो. त्यांच्यात झालेल्या वादावर चर्चा करण्यासाठी हे दोघे पुन्हा एकत्र आले होते. मात्र, चर्चा शांतपणे न सुटत वाद वाढला. त्या रात्री सुमारे अडीच वाजता साजिदच्या मित्राने रोहित पासी आणि त्याचा साथीदार प्रवीण उज्जीनवाल यांना अडवला. त्यानंतर साजिदला फोन करून बोलावून घेतलं. साजिद मदतीसाठी घटनास्थळी पोहोचताच,आधीपासूनच दबा धरून बसलेल्या 15 ते 20 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. साजिद गंभीर जखमी झाला होता त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
उल्हासनगर पोलिसांनी आरोपी रोहित पासी आणि त्याचा साथीदार प्रवीण उज्जीनवाल याला अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध पोलीस करत आहे. साजिदची पत्नी गरोदर आहे. जो पर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत मी साजिदचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा तीव्र आक्रोश तिने व्यक्त केला आहे. पोलिसांनी मुख्य दोन आरोपींना अटक केली आहे आणि उर्वरित आरोपींचा शोध सुरु आहे.