Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: निवारागृहातील कर्मचाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोटने उघड केली धक्कादायक माहिती

पुण्यातील फुरसुंगी येथील निवारागृहात काम करणाऱ्या 26 वर्षीय अतुल लाळगे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये संस्थाचालकाकडून मानसिक छळ, कामाचा ताण आणि धमकी दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल करून पोलिस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 30, 2026 | 02:35 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• फुरसुंगी येथील निवारागृह कर्मचारी अतुल लाळगे यांनी आत्महत्या केली.
• सुसाईड नोटमध्ये संस्थाचालकावर मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
• पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पुणे: पुणे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फुरसुंगी येथील एका निवारागृहात कार्यरत असलेल्या २६ वर्षीय कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मृत कर्मचाऱ्याने सुसाईड नोट लिहून ठेवले आहेत. या आधारे संस्थाचालकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच संस्थेतील कथित गैरप्रकारणाचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

काय नेमकं प्रकरण?

फलटण तालुक्यातील वडले येथील रहिवासी अतुल अंकुश लाळगे (वय 26) हे गेल्या अडीच वर्षांपासून फुरसुंगी येथील श्री साई सेवाभावी संस्था संचालित खुले निवारागृहात कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी २२ जूनला दुपारच्या सुमारास त्यांनी निवारागृहाच्या परिसरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

संभाजीनगर हादरलं! रॅप साँगच्या वादातून तरुणाचा निघृण खून; चाकू अन् सिमेंटच्या गट्ट्याने संपवलं

सुसाईड नोटमध्ये काय?

अतुल यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये संस्ताहचालक बालाजी मुस्कवाड यांच्याकडून होत असलेल्या मानसिक छळाचा उल्लेख केला आहे. कमी वेतनात जादा काम करून घेणे, संस्थेतील विविध घटनांची जबाबदारी एकट्यावर टाकणे, नोकरी सोडल्यास आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देणे, शिवीगाळ करणे तसेच वैयक्तिक कामे करून घेणे, अशा प्रकारच्या आरोपांचा उल्लेख नोटमध्ये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच सुसाईड नोटमध्ये संस्थेतील लहान मुलांशी संबंधित कथित गैरप्रकारांची चौकशी करून न्याय मिळावा, अशी इच्छा व्यक्त केल्याचेही समोर आले आहे.

आत्महत्येपूर्वी कुटुंबियांशी संवाद

या घटनेनंतर मृताचा चुलत भाऊ अनिकेत लहुदास लाळगे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. विशेष म्हणजे, आत्महत्येपूर्वी अतुल यांनी आपल्या बहिणीसह कुटुंबीयांशी संवाद साधताना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली होती, असा दावाही करण्यात आला आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी संस्थाचालक बालाजी मुस्कवाड यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून, सुसाईड नोटमधील आरोपांची तसेच संस्थेतील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी सुरू केली आहे. प्रकरणाच्या तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Delhi Crime : ‘मोमोज खायला चल’ म्हणत गाडीत बसवलं; चालत्या कारमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव काय आहे?

    Ans: अतुल अंकुश लाळगे (वय 26) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

  • Que: संस्थाचालकावर कोणते आरोप करण्यात आले आहेत?

    Ans: मानसिक छळ, जादा काम करून घेणे, धमकी देणे आणि वेतनासंबंधी त्रास दिल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी संस्थाचालकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.

Web Title: Pune crime shelter home employee commits suicide suicide note reveals shocking details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
1

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड
2

गणपतीच्या गर्दीत हातसफाई! पुण्यात ११ जणांची टोळी जेरबंद; ६३ मोबाइल लंपास केल्याचे उघड

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?
3

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.