Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Swargate Datta Gade Custody: नराधम दत्तात्रय गाडेला 12 दिवसांची पोलिस कोठडी; स्वारगेट प्रकरणात पुढे काय होणार?

Swargate Bus Depot Datta Gade Get Court Custody: पुणे पोलिसांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला शिवाजीनगर कोर्टात हजर केले. या प्रकरणी सुनावणी पार पडली. त्यावळेस कोर्टाने आरोपीला कोठडी सुनावली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 28, 2025 | 06:56 PM
Datta Gade News :

Datta Gade News :

Follow Us
Close
Follow Us:

Pune Swargate Datta Gade Custody News: पुण्यातील स्वारगेट एसटी बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या अत्याचारानंतर संबंधित आरोपी हा घटनास्थळावरून पळून गेला होता. अखेर पुणे पोलिसांनी या नराधमला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला कोर्टात हजर करण्यात आले. दरम्यान पुणे कोर्टाने आरोपी दत्ता गाडेला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुणे पोलिसांनी स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला शिवाजीनगर कोर्टात हजर केले. या प्रकरणी सुनावणी पार पडली. त्यावळेस कोर्टाने आरोपीला कोठडी सुनावली आहे. आरोपी दत्ता गाडेने स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. अखेर अथक प्रयत्न करून पुणे पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. आता पोलिस कोठडीत त्याची चौकशी केली जाईल. त्यातून आणखी कोणत्या गोष्टी समोर येतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

धक्कादायक! “मी बलात्कार केला नाही, आमच्यात सहमतीने संबंध झाले,” दत्ता गाडेचा पोलिसांसमोर खुलासा

दत्ता गाडेचा पोलिसांसमोर खुलासा

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दत्ता गाडेने यांनी पोलिस कोठडीत टाहो फोडला. माझं चुकलं, मी पापी आहे, असं म्हणत तो रडत असल्याचे पुढे आलं आहे. तसेच मी तरुणीवर अत्याचार केला नाही. आमचे सहमतीने संबंध झाले, असा दावा आरोपीने पोलिसांसमोर केला असल्याचे सांगण्यात आलं आहे.

नराधम गाडे नेमकं कसा पळाला?

दत्तात्रय गाडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर स्वारगेट पोलिसांत १, शिक्रापूर येथे दोन तसेच शिरूर, कोतवाली व सुपा येथे प्रत्येकी एक असे ६ गुन्हे नोंद आहेत. हे सर्व गुन्हे मोबाईल स्नॅचिंगचे आहे. तो स्मार्ट आहे. घटनेच्या दिवशी तो मध्यरात्री गावावरून भाजीच्या गाडीत स्वारगेटपर्यंत आला होता. तेथून तो स्वारगेट बसस्थानकात थांबला, असेही समोर आले आहे.

शर्ट बदलले, बुट काढून चप्पल घातली; नराधम गाडे नेमकं कसा पळाला?

अत्याचारानंतर तो थेट त्याच्या मूळ गावी गेला. घरी जाऊन त्याने शर्ट बदलले. बुट काढून चप्पल घातली. नंतर तो पसार झाला. पोलीस अडीच ते तीनच्या सुमारास त्याच्या घरापर्यंत पोहचले देखील. पण, तोपर्यंत तो निघून गेलेला होता. पोलीस त्याच्या भावाला पाहिले. पोलिसांना भाऊ आरोपीसारखाच दिसत होता. त्यामुळे त्याला घेऊन आले. मात्र, काही वेळाने तो त्याचा भाऊ असल्याचे समोर आल्यानंतर चौकशी करून पुन्हा त्याचा माग काढला. भावानेच पोलिसांना तुम्ही येण्यापुर्वीच तो घरातून निघून गेला होता, अशी माहिती दिली. भावाच्या सांध्र्यामुळे पोलिसांच्या हातून तो निसटला गेला.

रात्री एका घरी त्याने पाणी प्यायले…

दत्तात्रयला पोलीस शोधत असल्याचे लक्षात येताच त्याने पोबारा केला. तो शेता-शेतात लपून फिरत होता. शिरूर भागात मोठी उस शेती व इतर बागायती शेती आहे. तो उसातून, व इतर बागायती शेतातून पळा-पळ करत होता. रात्री साडे आठच्या सुमारास त्याने अशाच शेतातील एका घरात पाणी मागितले. आजीने त्याला पाणी दिले. पण, आजीने त्याला अरे तू तर टीव्हीवर दिसत आहेत असे विचारलेही, पण तो पाणी पिऊन पसार झाला.

 

Web Title: Pune crime swargate bus depot news court gives 12 days police custody to accused datta gade latest crime updates marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • crime news
  • Datta Gade
  • Molestation of Girl
  • pune news

संबंधित बातम्या

नाव दुरुस्तीसाठी चार महिन्यांचा विलंब; संतप्त पालकाने शाळेतच केला आत्महत्येचा प्रयत्न
1

नाव दुरुस्तीसाठी चार महिन्यांचा विलंब; संतप्त पालकाने शाळेतच केला आत्महत्येचा प्रयत्न

बुलडाण्यात 21 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
2

बुलडाण्यात 21 वर्षीय तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

मुलगा नव्हे राक्षसच ! जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या; शेतीचा वाद टोकाला गेला अन्…
3

मुलगा नव्हे राक्षसच ! जन्मदात्या आई-वडिलांची केली हत्या; शेतीचा वाद टोकाला गेला अन्…

हाकेंच्या अडचणी वाढल्या, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
4

हाकेंच्या अडचणी वाढल्या, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.