संग्रहित फोटो
पुणे : स्वारगेट बसस्थानकातील अत्याचारप्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याबाबत धक्कादायक माहिती समोर येत असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी नेमकं कधी आणि कोठून पळाला हे जाणून घेऊयात. आरोपी आणि त्याचा सख्खा भाऊ एकसारखेच दिसत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो पोलिसांच्या हातून काही क्षणासाठी निसटला गेला. पोलीस त्याच्या घरी पोहचले, त्याच्या भावालाच पोलिसांनी उचलून आणले. पण, त्याच्या भावाने तो माझ्यासारखा दिसतो. तो निघून गेला घरून व तुम्ही मला पकडले असे सांगितले. नंतर पोलिसांनी भावाकडे चौकशी केली आणि पुन्हा त्याचा माग सुरू केला.
दत्तात्रय गाडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर स्वारगेट पोलिसांत १, शिक्रापूर येथे दोन तसेच शिरूर, कोतवाली व सुपा येथे प्रत्येकी एक असे ६ गुन्हे नोंद आहेत. हे सर्व गुन्हे मोबाईल स्नॅचिंगचे आहे. तो स्मार्ट आहे. घटनेच्या दिवशी तो मध्यरात्री गावावरून भाजीच्या गाडीत स्वारगेटपर्यंत आला होता. तेथून तो स्वारगेट बसस्थानकात थांबला, असेही समोर आले आहे.
अत्याचारानंतर तो थेट त्याच्या मूळ गावी गेला. घरी जाऊन त्याने शर्ट बदलले. बुट काढून चप्पल घातली. नंतर तो पसार झाला. पोलीस अडीच ते तीनच्या सुमारास त्याच्या घरापर्यंत पोहचले देखील. पण, तोपर्यंत तो निघून गेलेला होता. पोलीस त्याच्या भावाला पाहिले. पोलिसांना भाऊ आरोपीसारखाच दिसत होता. त्यामुळे त्याला घेऊन आले. मात्र, काही वेळाने तो त्याचा भाऊ असल्याचे समोर आल्यानंतर चौकशी करून पुन्हा त्याचा माग काढला. भावानेच पोलिसांना तुम्ही येण्यापुर्वीच तो घरातून निघून गेला होता, अशी माहिती दिली. भावाच्या सांध्र्यामुळे पोलिसांच्या हातून तो निसटला गेला.
रात्री एका घरी त्याने पाणी प्यायले…
दत्तात्रयला पोलीस शोधत असल्याचे लक्षात येताच त्याने पोबारा केला. तो शेता-शेतात लपून फिरत होता. शिरूर भागात मोठी उस शेती व इतर बागायती शेती आहे. तो उसातून, व इतर बागायती शेतातून पळा-पळ करत होता. रात्री साडे आठच्या सुमारास त्याने अशाच शेतातील एका घरात पाणी मागितले. आजीने त्याला पाणी दिले. पण, आजीने त्याला अरे तू तर टीव्हीवर दिसत आहेत असे विचारलेही, पण तो पाणी पिऊन पसार झाला.
दोनवेळा लैंगिक अत्याचार
स्वारगेट स्थानकामध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. आरोपी दत्तात्रय गाडे याने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले. शिवशाही बसमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. वैद्यकीय अहवालामध्ये तरुणीवर दोनवेळा लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट आले आहे.
एसटी बसची न्यायवैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी
ज्या बसमध्ये गाडेने तरुणीवर बलात्कार केला. त्या बसची न्यायवैद्यकीय तज्ज्ञांकडून (फॉरेन्सिक एक्सपर्ट) तपासणी करण्यात येणार आहे. एसटी बस न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविली आहे. संबंधित बसचालकाचा पोलिसांकडून जबाब नोंदविण्यात आला आहे.
तीस ते चाळीस जणांकडे चौकशी
नराधम दत्तात्रय गाडे याच्या मित्र-मैत्रिणींसह कुटूंबिय अशा तीस ते चाळीस जणांची पोलिसांकडून चौकशी केली आहे. तर भोर तालुक्यातील एका मैत्रीणीकडे चौकशी केली असता गाडेने तिच्या मैत्रिणींचे मोबाईल क्रमांक मागत होता. त्याने त्यांनाही त्रास दिल्याचा संशय आहे. दरम्यान, बुधवारी रात्री चौकशी गाडे याचे आई-वडील आणि भावाची पोलिसांनी केली. गाडेने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याचा पोलिसांचा संशय असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.