crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
पुणे: पुणे येथे एक धक्कदायक घटना घडली आहे. पुण्यातील चंदननगर परिसरात चोरीसाठी तीन चोर आलेले होते. त्यांना नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. यात एका चोराचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जलख्मी आहेत. मृत्य झालेल्या चोरांचे नाव नवाज इम्तियाज खान (वय 26, रा. भवानी पेठ, मूळ बेंगळुरू) असं नाव आहे. जखमींचा नवे हमीद अबजल मोहम्मद (वय 20) आणि हमीद अबजल अहमद (वय 19) अशी आहेत. दोघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी मध्यरात्री चंदननगर येथील पंचनगर परिसरात घडली आहे. एका भंगार दुकानात तिघे चोर चोरीसाठी शिरले. दोन चोर दुकानात घुसून लोखंडी साहित्य चोरत होते. तर एक बाहेर पहारा देत होता. चोरीदरम्यान झालेल्या आवाजामुळे परिसरातील नागरिक जागे झाले. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चोरांना पकडले आणि बेदम मारहाण केली आहे. काही चोर पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा लोकांनी त्यांना जवळच्या गोडाऊनमध्ये ओढून पुन्हा मारहाण केली. या हल्ल्यात नवाज खानचा मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले.
सकाळी दुकानाचा मालक कामावर आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्याने लगेच पोलिसांना कळवले. चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी पथक पाठवून पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, मारहाण करणाऱ्या नागरिकांविरोधातही पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी नागरिकांना कायदा हातात न घेता अशा घटनांची तत्काळ माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय संरक्षण अकादमीत 18 वर्षीय कॅडेटचा मृत्यू; कुटुंबीयांचा ‘रॅगिंग’चा गंभीर आरोप
पुण्याजवळील खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) मध्ये एका १८ वर्षीय कॅडेटचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृत्य झालेल्या तरुणाचे नाव पहिला टर्म कॅडेट अंत्रीक्ष कुमार सिंग असे असून तो मूळचा लखनऊ, उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. त्याचा मृतदेह शुक्रवारी पहाटे हॉस्टेलमधील आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळला. या घटनेनंतर मृत कॅडेटच्या कुटुंबीयांनी थेट रॅगिंगचा आरोप केला आहे. यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. ही घटना अतिशय गंभीर असून संपूर्ण राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये याचे पडसाद उमटले आहेत.