Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: सियाने केतनच्या हत्येसाठी लोहगडच का निवडला? तपासात समोर आलेली थरारक क्राईम स्टोरी

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात तपासातून धक्कादायक बाबी समोर येत आहेत. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेत लोहगडावर नेण्यामागे कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. लग्नाची तयारी, प्री-वेडिंग शूट आणि नात्यातील वाद यानंतर पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची चौकशी केली. तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 24, 2026 | 11:33 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • केतन आणि सियाचा फेब्रुवारीत साखरपुडा झाला होता.
  • लोहगडावर झालेल्या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
  • सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाला दिशा मिळाली.
पुणे: केतन अग्रवाल याचा मृत्यू पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून झाला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे समोर आले होते मात्र तो अपघात नसून हत्या असल्याचे समोर आले आहे. केतन अग्रवाल याची होणारी बायको म्हणजे सिया गोयल हिच्या वाढदिवशी ते लोहगडावर ट्रेकिंग करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्याला सियाने ढकले असा आरोप करण्यात आला आहे. मात्र तिने केतनला मारण्यासाठी लोहगडच का निवडला? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच, जाणून घ्या…

काय नेमकं प्रकरण?

सिया आणि केतनचा फेब्रुवारी महिन्यात साखरपुडा झाला. या दोघांचं लग्न नोव्हेंबरमध्ये होणार होते. त्यासाठी जयपूरमध्ये 14 कोटींचा पॅलेस आणि दोन खासगी विमानं बुक करण्यात आली होती. मात्र त्याआधी काहीही करून केतनचा काटा काढण्याचं सियान आणि चेतन चौधरीने ठरवलं. केतनला ट्रेकिंगची आवड होती हे सियाला माहिती होते. म्हणून केतनला लोहगडावर घेऊन जायचं आणि तिथे त्याला संपवायचं असा कट रचण्यात आला. केतन आणि सियाचं प्री वेडिंग शूट बालीला करण्याचं ठरवलं. ६ जूनला विमानाची तिकीट सुद्धा बुक झाली होती. मात्र त्यापूर्वीच ४ जूनला केतनला लोहगडावर घेऊन जायचं आणि प्रेमातील अडसर दूर करायचे.

Beed: विलास घुले हत्या प्रकरणावर राजकीय हालचालींना वेग; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत भेट, खासदार पुत्राच्या भूमिकेचीही चौकशी

केतनला सियाने लोहगडावर जाऊयात असे विचारले होते मात्र केतनने जाण्यास नकार दिला. ६ जूनला बाली जाण्यासाठी ते एअरपोर्टला गेले. मात्र प्री वेडिंग शूट टाळण्यासाठी सियानं केतनचा पासपोर्ट गायब केला. त्यामुळं मुंबई विमानतळावर पोहचलेल्या केतनला बालीचं प्री वेडिंग शूट रद्द करण्याची वेळ आली. पुन्हा सियाने लोहगडावर जाण्याचा हट्ट धरला. तिच्या हट्टाखातर तो लोहगडावर ट्रेकिंगसाठी आला आणि तिथे त्याचा मृत्यू झाला.

सियाचा प्रियकर लोहगडावर

१८ जूनला कटानुसार चेतन देखील लोहगडावर होता. मात्र हे उघड होऊ नये म्हणून चेतननं स्वतःचा फोन न आणता, कामगाराचा फोन सोबत आणला होता. तो लोहगडावर हजर होता, हे समजू नये म्हणून हुडी आणि हेडफोन घालून स्वतःची ओळख लपवली. केतनची हत्या नसून अपघात आहे, हे पटवून देण्यासाठी सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीनं अशी बरीच खबरदारी घेतली. पण सीसीटीव्हीत सिया आणि चेतननं एकमेकांना जे खुनवलं, ते दिसलं आणि त्यांची तिच चूक त्यांच्या धक्कादायक कृत्याचा पर्दाफाश करण्यासाठी महत्त्वाची ठरली.

पुणे पोलिसांनी या धक्कादायक हत्याकांडाचा मोठ्या शिताफीने उलगडा केला. केतन अग्रवालच्या मृत्यूप्रकरणी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला बेड्या ठोकल्यात. त्या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. आता पुढील कारवाई काय होते याकडे संपूर्ण महाराष्ट्र्राच्या नजरा लागल्या आहेत.

Pune Crime: ‘तू मला वाढदिवशीच सोडून गेलास…’ इन्स्टाग्रामवर प्रेमाचा दिखावा अन्….; केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन अग्रवाल प्रकरण कुठे घडले?

    Ans: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर ही घटना घडली.

  • Que: सुरुवातीला घटनेचे कारण काय सांगण्यात आले होते?

    Ans: फोटो काढताना पाय घसरून केतन दरीत पडल्याचे सांगण्यात आले होते.

  • Que: पोलिसांनी तपासात काय केले?

    Ans: पोलिसांनी सीसीटीव्ही, तांत्रिक पुरावे आणि चौकशीच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Pune crime why did siya choose lohagad for ketans murder the chilling crime story revealed during the investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 11:33 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
1

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
2

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…
3

Karnatak crime: ग्लुकोजच्या बाटलीतून विष अन् माजी सैनिकाचा मृत्यू; 3 महिन्यांनी मृतदेह काढला कबरीतून बाहेर…

PMRDA Commissioner Dr Abhijit Chaudhari: पीएमआरडीएने नवीन विकास निकष ठरवण्यापूर्वी कायदेशीर वैधता तपासावी
4

PMRDA Commissioner Dr Abhijit Chaudhari: पीएमआरडीएने नवीन विकास निकष ठरवण्यापूर्वी कायदेशीर वैधता तपासावी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.