
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
पुणे: आजकाल लग्न जमत नसेल तर विवाह संस्थेत आपण संपर्क करतो. मुलं मुलींचे बायोडेटा दिला जातो. अनेक जणांची विवाह संस्थेत किवा साइटवर लग्न जमल्याच आपण पाहील आहे. पण तुम्ही एखाद्या विवाह संस्थेत जात असला. आणि ते खरंच अधिकृत आहे का? हे आपलयाला माहिती नसत. अर्थात याची आपल्याला खात्री नसते आणि याच कारणाने अनेकदा फसवणूक देखील होते. असाच एक फसवणुकीचा प्रकार पुण्यातील स्वारगेट मध्ये घडला आहे. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या.
Nilesh Ghaywal : गँगस्टर निलेश गायवळचा ‘जमीनखरेदी साम्राज्य’ उघड; अवघ्या तीन वर्षांत…
पुण्यातील स्वारगेट पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुलं मुलींचे प्रोफाइल बदलून, जात बदलून एकमेकांना पाठवण्यात आले. जेव्हा एका मुलाच्या वडिलांच्या लक्षात हा प्रकार आला तेव्हा याचा भांडाफोड झाला. तीन जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. राजेश बेल्हेकर यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. लग्न जमवून देतो म्हणून पैशाचे पण व्यवहार केले, नंतर फसवणूक झाल्याच लक्षात आल.
कशी केली फसवणूक?
शुभ ऋषी नावाने विवाह संस्था चालवली जात होती. मुला मुलीचे फोटो ,प्रोफाइल , त्यावर जात बदलवून वेगवेगळ्या पद्धतीने फिरवले जात होते. राज्य महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर प्रतिभा तरसे, विद्या देशपांडे आणि निलेश वर्हाडे या तिघांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश बेल्हेकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या मुलांसाठी त्यांनी स्थळ पहिल होत. त्यांना एका मुलीचं प्रोफाइल आणि फोटो पाठवण्यात आले मात्र त्यांना यासाठी पैसे मागण्यात आले. त्या नंतर त्यांना फसवणूक झाल्याच लक्षात आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे दाखल करण्यात आलेले सगळे
नाशिकचे आहेत. यांनी अजून किती जणांना फसवलं आहे. याची चौकशी करण्यात आली आहे.
विवाह संस्थेत तुमची फसवणूक होवू शकते
विवाह संस्थेत नोंदणी करताना दोन्ही बाजूचे अनोळखी असतात. त्यामुळे कागदपत्र आणि आपली माहिती देताना खात्री करा आणि मगच आपली कागद द्या. विवाह संस्थेत तुमची आर्थिक फसवणूक पण होवू शकते ती तुम्हाला पूर्ण माहिती घेवूनच टाळता येईल.
Beed Crime: बीडमध्ये गुन्हेगारांची हाईट ! रात्रीत बँकच फोडली, लाखो रुपये केले लंपास