बीड: बीडमध्ये गुन्हेगारी आणि दहशत माजवण्याच्या घटना आपण सातत्याने पाहत आहोत. आता पुन्हा एकदा गुन्हेगाराने कळस गाठला आहे. बँकेच्या पाठीमागची भिंत तोडून थेट बँकेत प्रवेश केला आणि बँकच लुटण्याचा प्रकार बीडमध्ये घडला आहे. पाली गावाजवळ बँक लुटण्याचा प्रकार घडला आहे. कॅनरा बँक लुटल्याने आता ठेवीदारांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाल आहे.
वरून दगड आला, सनरूफ फोडून महिलेच्या डोक्यात लागला; Tamhini घाटात भयानक अपघात
कशी लुटली बँक ?
पाली गावाजवळ या बँकेची शाखा आहे. या बँकेत अनेक जणांच्या ठेवी आहेत. बँकच फोडल्याने ठेवीदार चिंतेत आहेत. गैस कटरच्या सहाय्यने त्याने आत प्रवेश केला आणि बँक लुटली. चोरी करताना मोठी रक्कम लंपास केली आहे. काही ठेवीदारांनी सोने ठेवले आहेत, ते ही लंपास केल्याची माहिती आहे. अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. मात्र चोरांचा शोध सध्या घेतला जात आहे. बीडमध्ये सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित आहे का? हा प्रश्न विचारलं जातो. मात्र आता बँकच लुटल्याने हा प्रकार आता चर्चेचा विषय बनला आहे.
बँकेत सुरक्षा रक्षक नव्हता का?
सध्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून या चोरांचा शोध घेतला जात आहे. मात्र बँकेच्या ठिकाणी रक्कम आणि ठेव असताना तिथे बँकेची सुरक्षा नव्हती का? रात्रीच्या वेळी ठेवींचं काय? सुरक्षा रक्षक रात्रीच्या वेळी कुठे गेले होते? गैस कटरच्या सहाय्याने जर रात्री चोरी केली जात असेल तर तिथे कोणी आल नाही का? हे मुद्दे आता निर्माण झाले आहेत.
पोलिसांचा तपास सुरु
पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. संशयित वाहन याचा सध्या शोध घेतला जात आहे. चोर नक्की कुठून आले? जवळच्या परिसरातील ते आहेत का? बँकेत रात्रीच्या वेळी परिसरात कोणी नसत याचा त्यांना सुगावा होता का? या सगळ्या प्रश्नांचा शोध घेतला जात आहे. सध्या पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला जात आहे. मात्र आता या प्रकरणात पोलीस आरोपीना कधी अटक करतात हे पाहावे लागेल. काही दिवसांपूर्वी १५ लाख रुपयाचा दरोडा घालण्यात आला होता. हे प्रकरण ताज असतानाच आता बँक लुटण्याचा प्रकार घडला आहे.
Uttar Pradesh Crime: लग्नाला अवघं वर्ष झालं होतं… पत्नीची निर्घृण हत्या करून मृतदेह खोलीत लपवला






