Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’; अलका चौकात पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट, पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा भडका

पोलिसांनी डीजे बंद करण्यास सांगितले, मात्र मंडळाच्या पदाधिकाऱ्याने थेट माईकवरूनच पोलिसांना उलट सवाल केला. ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’ म्हणत अलका चौकातच डीजे पुन्हा सुरू करण्यात आला. दरम्यान, लक्ष्मी रस्त्यावरील ध्वनी पातळीने यंदा पुन्हा १०० डेसिबलचा टप्पा ओलांडल्याचे पाहणीत समोर आले.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 27, 2026 | 03:42 PM
‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’; अलका चौकात पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट, पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा भडका

‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’; अलका चौकात पोलिसांसमोरच डीजेचा दणदणाट, पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा भडका

Follow Us
Follow Us:
  • ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’; अलका चौकात पोलिसांसमोर डीजे सुरू
  • लक्ष्मी रस्त्यावर सरासरी १०४.५ डेसिबल ध्वनी पातळी
  • २०२५च्या ९२.६ dBच्या तुलनेत यंदा ११.९ dBने वाढ

पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा दणदणाट आणि ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा यंदाही ऐरणीवर आला आहे. अलका चौकात डीजे बंद करण्याच्या पोलिसांच्या सूचनेला एका गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याने माईकवरूनच विरोध केल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’ असे म्हणत संबंधित मंडळाने डीजे सुरू ठेवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पुण्यातील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता आणि केळकर रस्त्यावरून सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका अलका टॉकीज चौकाकडे येत होत्या. अलका चौकात पोलिसांनी डीजे वाजवण्यास निर्बंध घातले होते. मात्र, एका मंडळाची मिरवणूक चौकात पोहोचल्यानंतर मोठ्या स्पीकर्सचा आवाज सुरूच राहिला. व्हिडीओमध्ये पोलिसांकडून स्पीकर बंद करण्यास सांगितल्यानंतर मंडळाचा पदाधिकारी माईकवरून पोलिसांशी बोलताना दिसत आहे. ‘आमचा बंद तर सगळ्यांचा बंद’ असे म्हणत त्याने इतर मंडळांचेही स्पीकर बंद करण्याची मागणी केली. त्यानंतर डीजे पुन्हा सुरू करण्यात आल्याचे व्हिडीओत दिसते. या प्रकारामुळे पोलिसांच्या आदेशाची अंमलबजावणी आणि विसर्जन मिरवणुकीतील ध्वनी नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

हेही वाचा: Crime News: आईला फोन करून म्हणाली, ‘माझ्यासोबत मारहाण झाली’; काही वेळातच होमस्टेमध्ये विद्यार्थिनीला पाहताच…

लक्ष्मी रस्त्यावर १०४.५ डेसिबल

दरम्यान, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाने केलेल्या पाहणीत लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीदरम्यान ध्वनी पातळी मोठ्या प्रमाणात असल्याचे समोर आले आहे. दिलेल्या आकडेवारीनुसार, लक्ष्मी रस्त्यावरील प्रमुख चौकांची एकूण सरासरी ध्वनी पातळी १०४.५ डेसिबल नोंदविण्यात आली.  होळकर चौकात १०६.८, शेडगे विठोबा चौकात १०६.३, टिळक चौकात १०५.५, गोखले चौकात १०४.४ आणि खंडोजीबाबा चौकात १०४.२ डेसिबलची सरासरी नोंद झाली. उंबऱ्या चौकात १०४.१, बेलबाग चौकात १०४, लिंबराज महाराज चौकात १०३.५, गणपती चौकात १०३.३ आणि कुंटे चौकात १०२.८ डेसिबल ध्वनी पातळी नोंदली गेली.

पाच वर्षांत पुन्हा वाढ

पाहणीतील आकडेवारीनुसार लक्ष्मी रस्त्यावरील सरासरी ध्वनी पातळीत २०२२ ते २०२५ या काळात घट झाली होती. २०२२मध्ये १०५.२, २०२३मध्ये १०१.२, २०२४मध्ये ९४.८ आणि २०२५मध्ये ९२.६ डेसिबलची सरासरी नोंद झाली. मात्र, २०२६मध्ये ही सरासरी पुन्हा वाढून १०४.५ डेसिबल झाली आहे. तसेच शुक्रवारी दुपारी चार ते मध्यरात्रीपर्यंतच्या कालावधीतही ध्वनीची तीव्रता मोठी होती. दुपारी चार वाजता सरासरी ११३.४, रात्री आठ वाजता १११.९ आणि मध्यरात्री बारा वाजता ११२.६ डेसिबलची नोंद झाल्याचे आकडेवारीत नमूद आहे. त्यामुळे एका बाजूला पोलिसांकडून डीजेवर निर्बंध घालण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला काही मंडळांकडून नियमांना विरोध आणि मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक सुरू ठेवण्याचे प्रकार समोर आल्याने विसर्जन मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Web Title: Pune ganpati visarjan dj noise pollution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 03:42 PM

Topics:  

  • DJ Speaker
  • Ganesh Festival 2026
  • Latest pune news update
  • pune ganpati

संबंधित बातम्या

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा कहर! लक्ष्मी रस्त्यावर १०४.५ डेसिबलची नोंद; COEP चा अहवाल समोर
1

पुण्यात विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचा कहर! लक्ष्मी रस्त्यावर १०४.५ डेसिबलची नोंद; COEP चा अहवाल समोर

Pune: गणेश विसर्जनात ‘१०८’ची आपत्कालीन सेवा कुठे अडकली? महिला पत्रकारासाठी रुग्णवाहिका मिळवताना धावपळ
2

Pune: गणेश विसर्जनात ‘१०८’ची आपत्कालीन सेवा कुठे अडकली? महिला पत्रकारासाठी रुग्णवाहिका मिळवताना धावपळ

Pune News: गणेश मंडळांवर आठवडाभरात गुन्हे दाखल करा; विसर्जन मिरवणुकीतील नियमभंगावर कारवाईची मागणी
3

Pune News: गणेश मंडळांवर आठवडाभरात गुन्हे दाखल करा; विसर्जन मिरवणुकीतील नियमभंगावर कारवाईची मागणी

पुणेकरांचे प्रचंड हाल! प्रशासन बेफिकीर? 35 तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीने नियोजनावर उठले गंभीर प्रश्न
4

पुणेकरांचे प्रचंड हाल! प्रशासन बेफिकीर? 35 तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीने नियोजनावर उठले गंभीर प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.