
Heart Attack News: दिवाळी पहाट मैफलीत वादन करताना आला तीव्र हृदयविकाराचा झटका; प्रसिद्ध मृदंगवादकांच्या निधनाने संगीत जगात शोककळा!
पुण्यातील बाणेर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या एका ‘दिवाळी पहाट’ मैफलीमध्ये श्रीधर पार्थसारथी मृदंग वादन करत होते. सादरीकरण रंगात आले असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. व्यासपीठावरच ते कोसळल्यानंतर उपस्थितांनी त्यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
श्रीधर पार्थसारथी यांचा संगीत प्रवासातील योगदान मोलाचे राहिला आहे. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे धडे घेण्यास सुरुवात केली होती. प्रसिद्ध संगीत गुरू विद्वान कारैकुडी आर. चंद्रमौळी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मृदंग वादनाचे बारकावे आत्मसात केले. त्यांनी डी. के. पट्टम्मळ, विद्वान मदुराई जी. एस. मणी, डॉ. एम. बालमुरलीकृष्ण आणि विद्वान रंगनाथ शर्मा यांसारख्या भारतीय शास्त्रीय संगीतातील उत्तुंग व्यक्तिमत्त्वांसोबत साथसंगत केली. याशिवाय शंकर महादेवन, संजीव अभ्यंकर, रतनमोहन शर्मा आणि नंदकिशोर मुळे यांच्यासमवेत त्यांच्या जुगलबंदीच्या मैफली अत्यंत गाजल्या होत्या.
श्रीधर पार्थसारथी यांच्या निधनाची बातमी समजताच संगीत जगतातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. प्रसिद्ध गायक व संगीतकार शंकर महादेवन यांनी इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली. “हे वृत्त पचवणं अत्यंत कठीण आहे. हे संपूर्ण संगीत विश्वाचे कधीही न भरून निघणारे नुकसान आहे. सुमारे ४० वर्षांपूर्वी मी जेव्हा माझी पहिली कर्नाटक शास्त्रीय संगीताची मैफल केली होती, तेव्हा माझ्या पाठीशी मृदंगावर श्रीधरच होता. एका जिवंत मैफलीत वादन करत असतानाच त्यांनी जगाचा निरोप घेतला, यापेक्षा विलक्षण काय असू शकते!” अशा शब्दांत महादेवन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Ans: पुण्यातील बाणेर येथे आयोजित 'दिवाळी पहाट' मैफलीमध्ये मृदंग वादन करत असतानाच त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला व रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
Ans: ते भारतीय शास्त्रीय संगीतातील अत्यंत प्रख्यात आणि लोकप्रिय मृदंगवादक होते.
Ans: शंकर महादेवन यांनी इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट लिहून हा संपूर्ण संगीत विश्वासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले आणि सुमारे ४० वर्षांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला.