Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Leopard Attack: आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर बिबट्याने चिमुकलीला ओढून नेलं; शिरूर गावात भीतीचं वातावरण

Pune Leopard Attack: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय भाग्यश्री वारे हिचा मृत्यू झाला. आई-वडिलांसोबत गोठ्याजवळ झोपलेल्या चिमुकलीला बिबट्याने उसाच्या शेतात ओढून नेले. घटनेनंतर ग्रामस्थांनी वन विभागाविरोधात संताप व्यक्त करत तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 23, 2026 | 12:03 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी येथे बिबट्याच्या हल्ल्यात 5 वर्षीय भाग्यश्री वारेचा मृत्यू.
  • आई-वडिलांसमोर चिमुकलीला बिबट्याने उसाच्या शेतात ओढून नेले.
  • ग्रामस्थांचा वन विभागावर संताप; पिंजरे, गस्त आणि तातडीच्या उपाययोजनांची मागणी.
Pune: पुणे जिल्ह्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. शिरूर तालुक्यातील पिंपळसुटी गावात पहाटे बिबट्याने पाच वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून तिला उसाच्या शेतात ओढून नेल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी वन विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. वारंवार बिबट्याचे हल्ले होत असतानाही प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. (Pune Leopard Attack)

काय घडलं नेमकं?

भाग्यश्री संदीप वारे (वय ५ वर्षे) असे मृत बालिकेचे नाव आहे. भाग्यश्रीसह तिचे आई-वडील हे ऊसतोडीच्या कामासाठी पिंपळसुटी येथे वास्तव्यास होते. हे कुटुंब शेतातील गोठ्याजवळ झोपलेले असतांना, पहाटे पावणेतीनच्या सुमारास बिबट्याने अचानक या चिमुकलीवर हल्ला केला. मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून आई-वडील तात्काळ जागे झाले. मात्र, तोपर्यंत बिबट्याने तिला उसाच्या शेतात ओढून नेले होते. याची माहिती तातडीने ग्रामस्थांना देण्यात आली. ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरु केली असत, उसाच्या शेतात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले.

Thane Crime: गर्लफ्रेंड वॉशरूमला गेली असं सांगून प्रियकर पळाला; रूम उघडताच समोर आलं धक्कादायक दृश्य

बाधित कुटुंबाला आर्थिक मदत

घटनेची माहिती मिळताच जुन्नर वन विभागाकडून घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह ताब्यात घेत पुढील वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मृत मुलीच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया वन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. परिसरात बिबट्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली असून, आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावणे, कॅमेरा ट्रॅप बसवणे, ड्रोनद्वारे पाहणी करणे आणि रात्रगस्त वाढवण्याचे काम वन विभागाकडून केले जात आहे. या घटनेने तालुक्यात भीतीचे वातावरण आहे.

बिबट्याच्या हल्ल्याची पाचवी घटना

शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याच्या हल्ल्याची ही पाचवी घटना असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर पिंपळसुटी परिसरातील बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. वारंवार अश्या घटना घडूनही बिबट्यांचा वावर आणि हालचाली रोखण्यासाठी वन विभागाकडून प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिसरात तात्काळ पिंजरे उभारणे, नियमित गस्त वाढवणे आणि बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करणे, अशा मागण्या नागरिकांकडून केल्या जात आहेत.

लज्जास्पद! बिहारच्या औरंगबादमध्ये नेपाळी तरुणीवर गँगरेप, १०० रुपये देऊन आरोपी फरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव काय?

    Ans: भाग्यश्री संदीप वारे (वय 5 वर्षे).

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: पिंपळसुटी, शिरूर तालुका, पुणे जिल्हा.

  • Que: घटनेनंतर ग्रामस्थांनी कोणती मागणी केली?

    Ans: बिबट्याचा तातडीने बंदोबस्त, पिंजरे लावणे आणि वन विभागाने गस्त वाढवावी.

Web Title: Pune leopard attack a leopard dragged the little girl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
1

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
2

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
3

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
4

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.