Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिक्रमणधारकांची मुजोरी, पुणे महापालिकेच्या अधिकार्‍यांना केली धक्काबुक्की

पुण्यातील एफ.सी रस्त्यावरील सागर आर्केड येथील फुटपाथवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अधिकार्‍यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 07, 2025 | 06:39 PM
अतिक्रमणधारकांची मुजोरी, पुणे महापालिकेच्या अधिकार्‍यांना केली धक्काबुक्की

अतिक्रमणधारकांची मुजोरी, पुणे महापालिकेच्या अधिकार्‍यांना केली धक्काबुक्की

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील एफ.सी रस्त्यावरील सागर आर्केड येथील फुटपाथवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अधिकार्‍यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी महिलेसह चौघांवर डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधुरी समीर मराठे (वय ३२, रा. कोथरूड), गालिब अब्दुल मजिद शेख (वय २७, रा. जनवाडी) व अन्य अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सचिन घेंगे (वय २९, रा. मांजरी) यांनी तक्रार दिली आहे. सोमावारी (दिनांक ६) सायंकाळी ही घटना घडली आहे.

हे सुद्धा वाचा : Milk Onion Price | दूध अन् कांदा दरवाढीसाठी सुप्रिया सुळे आक्रमक; सरकारला दिला इशारा

पोलिसांच्या माहितीनूसार, एफ.सी रस्त्यावरील फुटपाथवर अवैधरित्या व्यवसाय थाटण्यात आले आहेत. अनेक फेरीवाल्यांकडून येथे व्यवसाय केले जातात. परिणामी ये जा करणार्‍या पादचार्‍यांना त्रास होतो. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेकडून एफ. सी रस्त्यावरील फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. सोमवारी सांयकाळी येथील सागर आर्केड समोरील फुटपाथवर फिर्यादी घेंगे व त्यांचे सहकारी अतिक्रमण हटविण्याचे काम करीत होते. यावेळी आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. त्यातील एकाने फिर्यादींची कॉलर पकडून अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. डेक्कन पोलीस पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : मी शेवटचं सांगतो, शहर सोडून जा, नाहीतर…; पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना दम

जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड व दहशत माजविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.

Web Title: Pune municipal officials have been beaten up nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 06:34 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune mahapalika

संबंधित बातम्या

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
1

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त
2

गावठी कट्टे बाळगणाऱ्या सराईतांची धरपकड, पाच जणांना घेतले ताब्यात; चार पिस्तुले जप्त

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
3

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ
4

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.