
Pune Crime News: पुण्यात आलिशान फ्लॅटवर लंडनच्या विद्यार्थिनीचा ५ दिवस कुजलेला मृतदेह; एसीमुळे शेजाऱ्यांनाही लागला नाही सुगावा!
मिळालेल्या माहितीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी मुग्धाचे तिच्या आईशी शेवटचे बोलणे झाले होते. त्यावेळी तिने आपण एका मुलाखतीसाठी जात असल्याचे सांगत घाईत असल्याचे सांगितले होते. यानंतर तिचा कुटुंबीयांशी संपर्क पूर्णपणे तुटला. काळजीपोटी कुटुंबीयांनी लंडन येथील तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली असता, मुग्धा ऑगस्टच्या शेवटीच भारतात परतल्याचे समजल्याने सर्वांनाच धक्का बसला.
कुटुंबीयांनी तिच्या बँक खात्याचे स्टेटमेंट तपासले असता झोमॅटो (Zomato), स्विगी (Swiggy) आणि ब्लिंकीट (Blinkit) वरून काही ऑर्डर केल्याचे दिसून आले. ती भारतातच असल्याचे स्पष्ट झाल्यावर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांत धाव घेत अपहरणाचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे गहुंजे येथील एका उच्चभ्रू इमारतीतील फ्लॅट गाठला.
पोलिसांनी जेव्हा दरवाजा उघडून आत प्रवेश केला, तेव्हा बेडवर मुग्धाचा कुजलेला मृतदेह आढळला. प्राथमिक अंदाजानुसार, तिचा मृत्यू ४ ते ५ दिवसांपूर्वी झाला असावा. इतके दिवस मृतदेह कुजत असूनही शेजाऱ्यांना कसलाच संशय आला नाही. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी रुममध्ये प्रवेश केला तेव्हा फ्लॅटमधील फॅन आणि एसी continuously सुरू होते. मागील ४-५ दिवसांपासून एसी सुरू राहिल्यामुळेच मृतदेहाची दुर्गंधी बाहेर पसरली नाही. त्यामुळे मुग्धाने स्वतः जीवन संपवण्यापूर्वी हे प्लॅनिंग केले होते की तिच्यासोबत काही घातपात घडवून एसी सुरू ठेवण्यात आला, असा दाट संशय व्यक्त होत आहे. पोलीस सध्या सर्व बाजूंनी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Ans: मृत तरुणीचे नाव मुग्धा देशमुख (वय ३४) असून ती मूळची छत्रपती संभाजीनगरची होती आणि लंडन येथे एमबीएचे शिक्षण घेत होती.
Ans: कुटुंबीयांचा संपर्क तुटल्यानंतर बँक स्टेटमेंटवरून ती भारतात असल्याचे समजले आणि पोलिसांच्या तांत्रिक तपासाद्वारे पुण्यातील गहुंजे येथील फ्लॅटवर तिचे शेवटचे लोकेशन सापडले.
Ans: फ्लॅटमध्ये गेल्या ४-५ दिवसांपासून फॅन आणि एसी सुरू असल्यामुळे मृतदेहाची दुर्गंधी बाहेर पसरली नाही.