Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: पुण्यात FDAची मोठी कारवाई! ‘मथुरा प्युअर व्हेज’ बंद; 7 नामांकित रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत प्रसिद्ध 'मथुरा प्युअर व्हेज' हॉटेल चाचणी अहवाल येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, अस्वच्छता आणि मुदतबाह्य अन्नसाठा आढळल्याने शहरातील आणखी सात नामांकित रेस्टॉरंट्सचे परवानेही निलंबित करण्यात आले आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 05, 2026 | 10:57 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • FDAने पुण्यातील ‘मथुरा प्युअर व्हेज’ हॉटेल चाचणी अहवाल येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले.
  • अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि मुदतबाह्य अन्नसाठा आढळल्याने 7 रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित करण्यात आले.
  • ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत राज्यभर अन्न सुरक्षा नियमांची तपासणी आणि कारवाई सुरू आहे.
पुणे: पुण्यातील हॉटेल्समध्ये जेवण करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) शहरातील अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर धडक कारवाई करत प्रसिद्ध ‘मथुरा प्युअर व्हेज’ हॉटेल चाचणी अहवाल येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने शहरातील आणखी सात नामांकित रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

पुण्यातील ज्या 7 रेस्टॉरंट्सवर एफडीएने धाडी टाकल्या, तिथे अन्न सुरक्षा कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे उघडकीस आले. तपासणी दरम्यान हॉटेलच्या स्वयंपाकघरात कमालीची अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे अन्न आणि मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आला. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारत प्रशासनाने त्यांचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत.

Ketan Agrawal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा आणखी एक धक्का! नातवाच्या मृत्यूचं दुःख सहन न झाल्याने आजोबांचं निधन

प्रसिद्ध ‘मथुरा प्युअर व्हेज’वर मोठी कारवाई

पुण्यातील प्रसिद्ध ‘मथुरा प्युअर व्हेज’वर झालेली कारवाई सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. एफडीएच्या पथकाने या हॉटेलमधील अन्नपदार्थांचे नमुने जप्त केले असून ते प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले आहेत. हा चाचणी अहवाल जोपर्यंत अधिकृतपणे येत नाही, तोपर्यंत हॉटेल पूर्णपणे बंद ठेवण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत.

हॉटेल चालकांचे धाबे दणाणले

राज्यात नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळावे यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. अन्न सुरक्षा मानकांचे पालन न करणाऱ्या आणि ग्राहकांच्या जिवाशी खेळणाऱ्या कोणत्याही हॉटेलची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आगामी काळातही पुण्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात ही तपासणी मोहीम अशीच तीव्रतेने सुरू राहणार असल्याने हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.

Navi Mumbai: खारघरच्या पांडवकडा धबधब्यावर दोन तरुण वाहून गेले; शोधमोहीम सुरू

💡

Frequently Asked Questions

  • Que: FDAने पुण्यात कोणती कारवाई केली?

    Ans: FDAने प्रसिद्ध 'मथुरा प्युअर व्हेज' हॉटेल चाचणी अहवाल येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आणि सात रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित केले.

  • Que: कारवाईमागील प्रमुख कारण काय होते?

    Ans: तपासणीत अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे अन्न, मुदतबाह्य अन्नसाठा आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले.

  • Que: 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेचा उद्देश काय आहे?

    Ans: नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी राज्यभर हॉटेल्स व रेस्टॉरंट्सची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.

Web Title: Pune news major fda crackdown in pune mathura pure veg shut down licenses of 7 renowned restaurants suspended

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • crime
  • Pune Crime
  • pune news

संबंधित बातम्या

Amol Balwadkar News: माझ्याशी मतभेद असतील तर राजकीय पातळीवर लढा, जनतेची कामे का रोखता?; अमोल बालवडकरांचा संताप
1

Amol Balwadkar News: माझ्याशी मतभेद असतील तर राजकीय पातळीवर लढा, जनतेची कामे का रोखता?; अमोल बालवडकरांचा संताप

Junnar Crime News: जुन्नर तालुक्यात ९ वर्षांच्या चिमुकलीवर उसाच्या शेतात अत्याचार करून हत्या; संशयित ताब्यात
2

Junnar Crime News: जुन्नर तालुक्यात ९ वर्षांच्या चिमुकलीवर उसाच्या शेतात अत्याचार करून हत्या; संशयित ताब्यात

Maharashtra Breaking News Today 2026: जंतरमंतरवरील आंदोलन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
3

Maharashtra Breaking News Today 2026: जंतरमंतरवरील आंदोलन प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

Sports News: पुण्यात स्नूकर लीगचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सची विजयी सलामी; साखळी फेरीत थेट..
4

Sports News: पुण्यात स्नूकर लीगचा थरार! स्कायलाईन स्ट्रायकर्सची विजयी सलामी; साखळी फेरीत थेट..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.