Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: जयपूरमध्ये शाही लग्नाची तयारी, पण लोहगडावर काळाचा घाला; 26 वर्षीय तरुण उद्योजकाचा 350 फूट दरीत पडून मृत्यू

पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर 26 वर्षीय तरुण उद्योजक केतन विशाल अग्रवाल यांचा 350 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला. कुटुंबीय आणि मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या केतन यांचा अचानक पाय घसरला. काही दिवसांतच होणाऱ्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या दुर्घटनेने अग्रवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 20, 2026 | 09:30 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लोहगड किल्ल्यावर पाय घसरून तरुण उद्योजकाचा दरीत पडून मृत्यू.
  • केतन अग्रवाल हे कुटुंबासोबत पर्यटनासाठी गेले होते.
  • लग्नाची तयारी सुरू असतानाच झालेल्या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त.
पुणे: पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. फिरण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय तरुण बिझनेसमन यांचा 350 फूट खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबीय आणि मित्रांसोबत किल्ला पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा अचानक पाय घसरला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. काही दिवसांतच होणाऱ्या लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकं काय घडलं?

मृत्यू झालेल्या तरुण बिझनेसमच नाव केतन विशाल अग्रवाल असे आहे. केतन अग्रवाल हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचे सुपुत्र होते. लोहगड हे ठिकाण पुणे आणि मुंबईतील पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय असून, पावसाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. केतन हे आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत लोहगड किल्ल्याला भेट देण्यासाठी गेले होते. किल्ल्याच्या विविध भागांची पाहणी करत असताना, अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते थेट दरीत कोसळले. त्यांना सावरण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना आणि शिवदुर्ग मित्र आणि मावळ वन्यजीव रक्षक संस्थेला मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दुर्गम भाग आणि पावसाळी वातावरणामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोठ्या अडचणी आल्या, तरीही प्रयत्नांची पराकाष्ठा करत केतन यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.

‘या’ कारणावरुन मित्रानेच घेतला मित्राचा जीव; पुण्यातील गोखलेनगर प्रकरणात धक्कादायक खुलासा

जयपूरमध्ये शाही लग्नाची तयारी

१९ जूनला केतन यांच्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस होता, ज्यासाठी त्यांनी महाबळेश्वरमध्ये खास सेलिब्रेशनचे नियोजन केले होते. या वाढदिवसाच्या उत्साहापाठोपाठ पुढच्याच महिन्यात जयपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा होणार होता. यासाठी जयपूरमधील एक भव्य राजवाडा बुक करण्यात आला होता आणि पाहुण्यांच्या सोयीसाठी विशेष दोन विमानांचीही व्यवस्था करण्यात आली होती. केतनच्या अकाली निधनामुळे नातेवाईक, मित्र आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत. या दुर्घटनेने पुन्हा एकदा पर्यटकांच्या सुरक्षेचा आणि डोंगराळ भागात फिरताना घ्यायच्या काळजीचा प्रश्न गंभीरपणे समोर आणला आहे. प्रशासनाकडून अशा प्रकारच्या पर्यटन स्थळांवर सुरक्षेच्या उपाययोजना वाढवण्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Pune Crime: पुन्हा संसार वाचवण्यासाठी गेली, पण जीव गमावला; पतीने ओढणीने गळा आवळून पत्नीची केली हत्या

💡

Frequently Asked Questions

  • Que: केतन अग्रवाल यांचा मृत्यू कसा झाला?

    Ans: लोहगड किल्ल्याची पाहणी करताना अचानक पाय घसरल्याने ते 350 फूट खोल दरीत कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.

  • Que: केतन अग्रवाल किती वर्षांचे होते?

    Ans: केतन अग्रवाल हे 26 वर्षांचे होते.

  • Que: या घटनेनंतर पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Pune news preparations for a royal wedding in jaipur but tragedy strikes at lohagad 26 year old entrepreneur dies after falling into a 350 foot gorge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात
1

वाहन तोडफोडीच्या घटना सुरुच! शस्त्रधारी टोळक्याने १९ वाहने फोडली; अल्पवयीनांसह तिघे ताब्यात

नवले पुलाजवळ अभिनेत्रीला अडवून अरेरावी; मारहाणीचाही प्रयत्न; नेमकं काय घडलं?
2

नवले पुलाजवळ अभिनेत्रीला अडवून अरेरावी; मारहाणीचाही प्रयत्न; नेमकं काय घडलं?

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त
3

दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला ठोकल्या बेड्या, अल्पवयीन साथीदारही ताब्यात; तब्बल १४ दुचाकी जप्त

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप
4

Kalyan News: कल्याण पूर्वेत पुनर्विकासावरून राडा; रहिवासी-बिल्डरमध्ये हाणामारी, परस्परांवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.