Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझ्या नराधम बापाला फाशीच द्या’; पर्वती अत्याचार प्रकरणातील आईचा टाहो, चिमुरडीने सांगितलेला थरार ऐकून जळेल काळजाचं पाणी

Pune Crime Parvati Case News: पुण्याच्या पर्वती भागात आजोबानेच ९ वर्षांच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नराधम बापाला फाशी द्या, अशी मागणी पीडितेच्या आईने केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 06, 2026 | 04:53 PM
'माझ्या नराधम बापाला फाशीच द्या'; पर्वती अत्याचार प्रकरणातील आईचा टाहो (Photo Credit- X)

'माझ्या नराधम बापाला फाशीच द्या'; पर्वती अत्याचार प्रकरणातील आईचा टाहो (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘माझ्या नराधम बापाला फाशीच द्या’
  • पर्वती अत्याचार प्रकरणातील आईचा टाहो
  • चिमुरडीने सांगितलेला थरार ऐकून जळेल काळजाचं पाणी
Pune Crime Parvati Case: पुण्यातील पर्वती परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. नसरापूर घटनेच्या जखमा अजून ताज्याच होत्या, की एका ७० वर्षीय नराधम आजोबाने आपल्याच ९ वर्षांच्या सख्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नात्याला कलंक लावणाऱ्या या घटनेमुळे जनमानसात तीव्र संतापाची लाट असून, पीडित मुलीच्या मातेने आपल्या नराधम पित्याला थेट फाशी देण्याची मागणी केली आहे.

धक्कादायक खुलासा: चिमुरडीने सांगितली आपबिती

पीडित मुलीची आई कपड्याच्या दुकानात कामाला असून, रात्री जेव्हा ती घरी परतली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या अंगावर ओरखड्याचे व जखमांचे वण पाहून मातेने विचारणा केली असता, नऊ वर्षांच्या चिमुरडीने सांगितलेला थरार ऐकून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. “आई, हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. तुम्ही दोघं कामावर गेल्यावर आजोबा मला जबरदस्ती स्वतःकडे खेचायचे,” असे चिमुरडीने रडत सांगितले. याआधी देखील असा प्रयत्न झाला होता, मात्र भीतीपोटी आणि कोणाशी संपर्क न झाल्याने हा प्रकार समोर आला नव्हता.

Grandfather Assaults Own Granddaughter in Pune’s Parvati; Parents Demand Death Penalty In a shocking and horrifying incident from Parvati, Pune, a grandfather sexually assaulted his own granddaughter. The victim’s parents, speaking out bravely, directly demanded that the accused… pic.twitter.com/1MPLg2YeAS — Pune Mirror (@ThePuneMirror) May 6, 2026

नराधम पित्याबद्दल मातेचा संताप

मीडियाशी बोलताना पीडित मुलीच्या आईला अश्रू अनावर झाले. “ज्या बापाने मला लहानाचं मोठं केलं, त्याच बापाने माझ्या काळजाच्या तुकड्यावर नजर टाकली. अशा नराधमाला जगण्याचा अधिकार नाही,” असे म्हणत तिने प्रशासनाकडे आपल्या बापाला कठोर शिक्षा म्हणजे फाशी देण्याची मागणी केली आहे. नात्यातील विश्वासाला तडा देणाऱ्या या कृतीने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.

काळजाचा थरकाप! तळेरानमधील पाझर तलावात बुडून जुळ्या बहीण- भावाचा मृत्यू

आरोपीचे गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि कौटुंबिक वाद

पीडित मुलीचे वडील रिक्षाचालक असून, त्यांनी आरोपीबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. साधारण वर्षभरापूर्वी मोबाइल चोरीच्या संशयावरून आरोपीला बाहेर काढले गेले होते. “सुरुवातीपासूनच ससऱ्याचे वर्तन संशयास्पद होते. मी पत्नीला स्पष्ट सांगितले होते की, तुला बाप हवा की संसार? तेव्हा तिने मुलांचा आणि संसाराचा विचार केला होता,” असे वडिलांनी सांगितले. आरोपी त्याच परिसरात चोरून राहत होता आणि योग्य संधीची वाट पाहत होता, असा संशय आता व्यक्त केला जात आहे.

घटनेची रात्री आणि पोलिसांची भूमिका

मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास, जेव्हा मुलीचा भाऊ झोपलेला होता आणि आई-वडील कामावर होते, तेव्हा आरोपीने खाऊचे आमिष दाखवून मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पुणे पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत ७० वर्षीय आरोपीला अटक केली आहे. परिसरात तणावाचे वातावरण असल्याने पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. “कोणत्याही प्रकारच्या निदर्शनांमुळे किंवा दगडफेकीमुळे तपासात अडथळा येऊ शकतो, त्यामुळे कायद्यावर विश्वास ठेवावा,” असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दौंड हादरलं! शाळेच्या गुणपत्रिकेवर खाडाखोड केल्याचा राग अनावर; बापानेच केली पोटच्या मुलीची हत्या

Web Title: Pune parvati shameful incident grandfather torture minor granddaughter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • crime news
  • Pune
  • Sexual Assault

संबंधित बातम्या

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
1

Pune News : पिंपळवंडीत भरदिवसा घरफोडी; शिक्षिकेच्या घराचे कुलूप तोडून सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
2

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
3

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
4

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.