
Jalgaon Crime News: रागाच्या भरात बायकोने लगावली कानशिलात, पतीने राग मनात ठेवून घेतला भयानक बदला...
यावलमधील अयेशा नगरात फरदीन खान आरिफ खान आणि त्याची पत्नी मशिराबी फरदीन खान हे तरुण जोडपे राहत होते. मंगळवारी घरात दोघेच असताना त्यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून कडाक्याचे भांडण झाले. या वादाच्या भरात संतापाच्या आहारी गेलेल्या मशिराबीने फरदीनच्या कानशिलात लगावली. एका थडक्याचा आणि अपमानाचा राग मनात ठेवून संतापलेल्या फरदीनने मशिराबीचा गळा दाबून निर्घृण खून केला आणि तो घटनास्थळावरून फरार झाला.
हत्येचा हा प्रकार उघडकीस येताच यावल पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत पसार झालेल्या आरोपी फरदीन खानला ताब्यात घेतले. सुरत वरून तातडीने धाव घेतलेली मृत मशिराबीची आई सफीयाबी सय्यद अक्रम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. लेकीच्या मृत्यूनंतर आईने पोलिस ठाण्यात फोडलेला टाहो आणि या घटनेमुळे संपूर्ण यावल शहरात पसरलेली सुन्न शांतता मनाला व्यथित करणारी आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मैनोद्दीन सय्यद करत आहेत.
Ans: यावल शहरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने अवघ्या २० वर्षीय पत्नीचा गळा दाबून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.
Ans: पतीच्या संशयावरून झालेल्या वादात पत्नीने राग अनावर होऊन पतीच्या कानशिलात लगावली होती, ज्याचा राग मनात धरून पतीने हे टोкаचे पाऊल उचलले.
Ans: पोलिसांनी या प्रकरणी काय कारवाई केली आहे?