Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Husband Decapitates Wife: एका हातात रक्ताने माखलेला कोयता, दुसऱ्या हातात पत्नीचं मुंडकं अन् थेट मंदिरात…

Husband Decapitates Wife: पतीने पत्नीचे शीर धडावेगळे केले आणि ते हातात घेऊन थेट मंदिरात जाऊन शांत बसला! पश्चिम बंगालमधील या अंगावर काटा आणणाऱ्या आणि हादरवून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसरात तीव्र दहशत पसरली आहे; मुलांसमोरच घडलेल्या या कृत्याने परीसर सुन्न झाला आहे!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 05, 2026 | 02:34 PM
Husband Decapitates Wife: एका हातात रक्ताने माखलेला कोयता, दुसऱ्या हातात पत्नीचे मुंडकं अन् थेट मंदिरात...

Husband Decapitates Wife: एका हातात रक्ताने माखलेला कोयता, दुसऱ्या हातात पत्नीचे मुंडकं अन् थेट मंदिरात...

Follow Us
Follow Us:
  • एका पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या करून शीर धडावेगळे केले
  • हत्येनंतर आरोपी हातात पत्नीचे शीर आणि कोयता घेऊन जवळच्या मंदिरात शांत बसला
  • पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली आणि मृतदेह व शीर ताब्यात घेतले
Husband Decapitates Wife: पश्चिम बंगालमधून एक अत्यंत मन सुन्न करणारी आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्याच पत्नीचे शीर आणि धड वेगळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पत्नीची अतिशय अमानुषरीत्या हत्या केल्यानंतर नराधम पती तिचे कापलेले शीर हातात घेऊन थेट मंदिरात जाऊन बसल्याचे समोर आले आहे. या भीषण घटनेमुळे परिसरात एकच दहशत पसरली असून पोलिसांनी संशयित आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमके काय घडले?

पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील गंगारामपूर येथे बुधवारी सकाळी हा अत्यंत भयानक प्रकार घडला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंटू घोष (वय ४७) नावाचा संशयित आरोपी एका मंदिरात अत्यंत शांतपणे बसलेला होता. काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने एक शेजारी त्याच्याजवळ गेला, तेव्हा त्याला हादरवून टाकणारे दृश्य दिसले. घोषने आपल्या पत्नीचे (सीमा सरकार, वय ४२) कापलेले शीर हातात धरले होते. हा किळसवाणा प्रकार पाहताच त्याने इतर गावकऱ्यांना बोलावले. त्यानंतर घोष एका हातात पत्नीचे शीर आणि दुसऱ्या हातात कोयता घेऊन मंदिरातून बाहेर आला.

हेही वाचा: Factory Owner Kills Worker: मुलीसोबतच्या प्रेमसंबंधांचा संताप अन् क्रिकेट बॅटने रात्रभर अमानुष मारहाण! फॅक्टरी मालकाने…

मुलांसमोरच केला घात, पोलिसांकडून आरोपी अटकेत

घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील करून आरोपी घोषला ताब्यात घेतले. अधिकाऱ्यांनी पीडितेचे शीर जप्त केले आणि तिच्या कुटुंबीयांकडे धड नसलेला मृतदेह सुपूर्द केला. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला अटक करण्यात आली असून ही अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना आहे. प्राथमिक तपासात वैवाहिक वादातून त्याने घरातच हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. त्यांना दोन मुले असून (एक ५ वर्षांचा आणि दुसरा १२ वर्षांचा) हत्येवेळी ती दोन्ही मुले घरातच उपस्थित होती. आरोपीने शेतात वापरले जाणारे धारदार शस्त्र या कृत्यासाठी वापरले होते.

हेही वाचा: Mhada Colony Robbery: मुलांच्या पिगी बँकेपासून सोन्याच्या दागिन्यांपर्यंत झाडून लांबवले; म्हाडा कॉलनीत लाखोंची घरफोडी!

आरोपीचे अनपेक्षित बदललेले वर्तन

स्थानिक रहिवासी आणि नातेवाईकांच्या सांगण्यानुसार, रिंटू घोष हा आधी सरकारी बस कंडक्टर म्हणून काम करत होता, मात्र त्याची नोकरी सुटल्यानंतर तो बऱ्याच वेळेस घरीच राहत असे. त्याचे नातेवाईक म्हणाले की, तो अलीकडे खूप विचित्र वागू लागला होता. त्याने कडक शाकाहारी आहार सुरू केला होता आणि तो “तंत्रविद्येसारखे” वर्तन करू लागला होता. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करत असून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पश्चिम बंगालमधील ही धक्कादायक घटना कुठे घडली?

    Ans: पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील गंगारामपूर येथे ही घटना घडली आहे.

  • Que: आरोपीने हत्येनंतर काय केले?

    Ans: पत्नीची निर्घृण हत्या करून तिचे शीर धडावेगळे केल्यानंतर आरोपी पती एका हातात शीर आणि दुसऱ्या हातात कोयता घेऊन जवळच्या मंदिरात जाऊन बसला होता.

  • Que: पोलिसांनी या प्रकरणी काय कारवाई केली आहे?

    Ans: पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आरोपी रिंटू घोषला अटक केली असून, न्यायवैद्यक पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Web Title: West bengal dakshin dinajpur husband decapitates wife temple sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Husband and wife
  • Murder Case
  • west bengal News

संबंधित बातम्या

Jalgaon Anti Corruption: ३ कोटींचे सोने अन् ५ कोटींची संपत्ती; लाचलुचपत विभागाने जळगावच्या अधिकाऱ्याची झडती घेताच उघडकीस आले…
1

Jalgaon Anti Corruption: ३ कोटींचे सोने अन् ५ कोटींची संपत्ती; लाचलुचपत विभागाने जळगावच्या अधिकाऱ्याची झडती घेताच उघडकीस आले…

Pathardi Robbery News: “पाथर्डीला जायचा रस्ता सांगा…” अन् तोंडावर बुक्की मारून ७५ वर्षीय आजींचे दागिने हिसकावले!
2

Pathardi Robbery News: “पाथर्डीला जायचा रस्ता सांगा…” अन् तोंडावर बुक्की मारून ७५ वर्षीय आजींचे दागिने हिसकावले!

Cosmetic Shop Drug Racket: बाहेरून साधी ज्वेलरी, आत ड्रग्सचा बाजार! पुण्यात २२ वर्षीय तरुणीच्या कृत्याने खळबळ
3

Cosmetic Shop Drug Racket: बाहेरून साधी ज्वेलरी, आत ड्रग्सचा बाजार! पुण्यात २२ वर्षीय तरुणीच्या कृत्याने खळबळ

Nashik Crime News: निव्वळ अपघात की पूर्वनियोजित घातपात? ग्राहकाने प्रेसर गन उचलली अन्… नाशिकमधील त्या घटनेने पोलीस चक्रावले!
4

Nashik Crime News: निव्वळ अपघात की पूर्वनियोजित घातपात? ग्राहकाने प्रेसर गन उचलली अन्… नाशिकमधील त्या घटनेने पोलीस चक्रावले!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.