Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीवघेण्या इंजेक्शनचा नशेसाठी वापर; पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या

जीवघेणा ठरू शकणाऱ्या इंजेक्शनची विनापरवाना विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 17, 2025 | 11:26 AM
जीवघेण्या इंजेक्शनचा नशेसाठी वापर; पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या

जीवघेण्या इंजेक्शनचा नशेसाठी वापर; पोलिसांनी एकाला ठोकल्या बेड्या

Follow Us
Follow Us:

पुणे : वडगावशेरी भागात सोमनाथ नगरमध्ये प्रतिबंधित व जीवघेणा ठरू शकणाऱ्या इंजेक्शनची विनापरवाना विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. अमीर अनिस खान (वय ३०, रा. वडगावशेरी) असे आरोपीचे नाव आहे. इंजेक्शनचा नशेसाठी वापर केला जात होता. याप्रकरणी विश्वनाथ शंकर गेणे (वय ४५, पोलिस हवालदार, चंदननगर पोलिस ठाणे) यांनी चंदननगर पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, खान याच्या ताब्यातून १५ बाटल्या औषध जप्त करण्यात आले आहे. या इंजेक्शनच्या एका बाटलीचा दर दीड हजार रुपये आहे. त्याचा वापर नशेसाठी करण्यात येत होता. आरोपीला औषधाची विक्री करण्यासाठी कोणतेही वैद्यकीय शिक्षण अथवा परवाना नसतानाही त्याने फायद्याच्या उद्देशाने त्याची विक्री सुरू ठेवली होती.

हे इंजेक्शन डॉक्टरांचा सल्ला न घेता वापरल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. यातून व्यक्तीच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, तसेच मृत्यू होण्याची शक्यताही असते, अशी माहिती पोलिसांनी दिली. चंदननगर पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास केला जात असून, याप्रकरणात आणखी कोणी सामील आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

हे सुद्धा वाचा : सराईत गुंडाच्या एन्काऊंटरप्रकरणी मोठी अपडेट; पत्नीने पलिसांना धक्काबुक्की केली अन्…

Web Title: Pune police has arrested a man for selling injections that are dangerous to health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 11:24 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात
1

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; दोन अल्पवयीन मुलांसह दोनजण ताब्यात

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
2

बनावट दारूचा गोरखधंदा उघडकीस! दोघांना घेतले ताब्यात; तब्बल ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी
3

सफवान खान टोळीची गुंडगिरी संपणार! मोक्का लागला; विशेष पोलिस महानिरीक्षक यांची मंजुरी

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक
4

दीड महिन्याच्या बाळाचा 1 लाख 20 हजारात सौदा! संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार; आई-वडिलांसह चौघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.