Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्याला ठोकल्या बेड्या; पुणे पोलीसांची मोठी कारवाई

बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराइताला गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली आहे. गुलटेकडी येथे ही कारवाई करण्यात आली असून, त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 23, 2025 | 04:18 PM
देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्याला ठोकल्या बेड्या; पुणे पोलीसांची मोठी कारवाई

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्याला ठोकल्या बेड्या; पुणे पोलीसांची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराइताला गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली आहे. गुलटेकडी येथे ही कारवाई करण्यात आली असून, त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त केले. ओंकार बाळू मावस (वय २१, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, साधना ताम्हाणे यांनी ही कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पथक कोंढवा भागात गस्त घालत होते. मावस हा डायस प्लॉट परिसरात थांबला होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस असल्याची माहिती पोलीस कर्मचारी उज्वल मोकाशी आणि शंकर कुंभार यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापाळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.

पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला पकडले

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्यानंतर काही महिन्यातच कारागृहातून जामीन मिळवत बाहेर पडल्यानंतर पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला गेल्या काही दिवसाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून पकडले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल व जीवंत काडतूस जप्त केले असून, ही कारवाई लोणी काळभोर परिसरात करण्यात आली आहे. अनिकेत गुलाब यादव (वय २२, रा. सोपाननगर, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे यांनी ही कारवाई केली. यादव याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. त्यानंतर यादव येरवडा कारागृहात होता. न्यायालयाकडून त्याने जामीन मिळविला. नुकताच तो कारागृहातून बाहेर पडला. दरम्यान, यादव याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस कर्मचारी बाळासाहेब सकटे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.

Web Title: Pune police has arrested a man who was carrying a country made pistol nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 04:14 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

मुंबईच्या समुद्रात राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा थरार! १७ क्लब, १२१ नौकानयनपटू सहभागी; विविध प्रकारांत इतरांनीही पटकावली विजेतेपदे
1

मुंबईच्या समुद्रात राष्ट्रीय यॉटिंग स्पर्धेचा थरार! १७ क्लब, १२१ नौकानयनपटू सहभागी; विविध प्रकारांत इतरांनीही पटकावली विजेतेपदे

पार्टीच्या बहाण्याने 17 वर्षांच्या मुलीला बोलावले अन् दोन तरुणांनी मिळून…; मिरा रोड परिसरातील धक्कादायक घटना
2

पार्टीच्या बहाण्याने 17 वर्षांच्या मुलीला बोलावले अन् दोन तरुणांनी मिळून…; मिरा रोड परिसरातील धक्कादायक घटना

Maharashtra Workers Welfare: एका केंद्रापासून २०८ केंद्रांपर्यंतचा प्रवास! महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची ८८ वर्षे पूर्ण
3

Maharashtra Workers Welfare: एका केंद्रापासून २०८ केंद्रांपर्यंतचा प्रवास! महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची ८८ वर्षे पूर्ण

एटीएस अधिकारी असल्याचे सांगून अटकेची धमकी; पुण्यात निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाखांची फसवणूक
4

एटीएस अधिकारी असल्याचे सांगून अटकेची धमकी; पुण्यात निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाखांची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.