Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तरुणांचे अपहरण करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

लुटमार करण्याच्या हेतूने तरूणांचे ओमीनी कारमध्ये अपहरण करून त्यांचे मोबाईल काढून घेत त्यांना अज्ञात स्थळी सोडणार्‍या तिघांना सिंहगडरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 05, 2025 | 01:16 PM
पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तरुणांचे अपहरण करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तरुणांचे अपहरण करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लुटमार करण्याच्या हेतूने तरूणांचे ओमीनी कारमध्ये अपहरण करून त्यांचे मोबाईल काढून घेत त्यांना अज्ञात स्थळी सोडणार्‍या तिघांना सिंहगडरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सागर सुनिल शिरोळे (34, भिमनगर स्टॉपजवळ, उत्तमनगर, पुणे), गजानन विलास मोरे (29, रा. धायरी, पुणे) आणि विराज शांताराम भोसले (26, रा. वारजे माळवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेेत. याबाबत जित पांडुंरंग कांबळे (18, रा. लक्ष्मी मंदीरामागे, लोणंद ता. खंडाळा जि. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.

दिनांक 3 जानेवारीच्या पहाटे 2 ते 4 वाजण्याच्या सुमारास पुणे-सातारा महामार्गावर नर्‍हे येथील ओमकार लॉज येथून जित कांबळे, जतीन झोडगे आणि अमीन सय्यद हे रस्त्याने पायी जात असताना आरोपींनी जतीन आणि आमिन यांना जबदस्तीने ओमीनी कारमध्ये घातले. नंतर त्यांचे मोबाईल काढून घेत त्यातील जतीन याला एका अज्ञातस्थळी तर आमीन याला पुढे अज्ञातस्थळी सोडून आरोपी पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच गुहे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, सिंहगडरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. चव्हाण, सचिन निकम, पोलिस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, सुरेश जायभाय आणि सागर पवार यांच्या पथकाने तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

हे सुद्धा वाचा : बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन महिलांना गंडवले; बिहारच्या टोळीचा पर्दाफाश

जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड व दहशत माजविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.

Web Title: Pune police has arrested the youth abductors nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 01:16 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune Crime: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी केली चोरी, दुचाकीसह दोन रिक्षा जप्त
1

Pune Crime: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी केली चोरी, दुचाकीसह दोन रिक्षा जप्त

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…
2

Cyber Crime : सायबर चोरट्यांचा आला व्हॉट्सॲप कॉल, महिलेला धमकी दिली अन्…

पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दारूची बाटली डोक्यात घातली अन्…
3

पूर्ववैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला; दारूची बाटली डोक्यात घातली अन्…

Pune News: सिमेंट मिक्सरच्या खाली चिरडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, तर तिची आई गंभीर जखमी; घटना सीसीटीव्हीमध्ये  कैद
4

Pune News: सिमेंट मिक्सरच्या खाली चिरडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, तर तिची आई गंभीर जखमी; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.