Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंडई मेट्रोजवळील ‘त्या’ खुनाचा लागला छडा; धक्कादायक कारणही आलं समोर

मंडई मेट्रो स्टेशनजवळ घडलेल्या खुनाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेला यश आले असून, अनैसर्गिक संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अहिल्यानगरमधील एकाला बेड्या ठोकल्या आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 05, 2025 | 04:47 PM
मंडई मेट्रोजवळील 'त्या' खुनाचा लागला छडा; धक्कादायक कारणही आलं समोर

मंडई मेट्रोजवळील 'त्या' खुनाचा लागला छडा; धक्कादायक कारणही आलं समोर

Follow Us
Follow Us:

पुणे : मंडई मेट्रो स्टेशनजवळ घडलेल्या खुनाचा छडा लावण्यात गुन्हे शाखेला यश आले असून, अनैसर्गिक संबंधातून हा खून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी अहिल्यानगरमधील एकाला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटू शकलेली नसून, त्याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. याप्रकरणी रमेश प्रकाश सत्रे (वय २१, रा. मु. पो. कातरड, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) याला अटक केली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी हा प्रकार समोर आला होता. ही कारवाई पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, अनिकेत बाबर, निलेश साबळे व त्यांच्या पथकाने केली आहे.

मंडई मेट्रो स्टेशन परिसरात मोकळ्या जागेत एका ५० ते ५५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी पाहणी केली असता त्याच्या गळ्यावर वार करून खून करण्यात आल्याचे समोर आले होते. तत्काळ गुन्हे शाखा व विश्रामबाग पोलिसांनी तपास सुरू केला होता. मयत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ५५ होते. तो फिरस्ता असल्याचे समोर आले. पण, त्याची ओळख मात्र पटली नाही. त्याचदरम्यान, सीसीटीव्ही व बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रमेश सत्रे नावाच्या व्यक्तीने हा खून केला आहे. त्यानूसार रमेशचा शोध सुरू केला.

रमेश याला शिरूर तालुक्यातून पकडले. चौकशीत त्याने खून केल्याची कबूली दिली. रमेश हा व्यसनी आहे. तर मयत हा फिरस्ता होता. त्यालाही दारूचे व्यसन आहे. दरम्यान मध्यरात्री मयताने रमेशकडे दारू मागितली होती. तेव्हा रमेशने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यातून त्याच्यात वादविवाद झाले. रागाच्या भरात रमेशने चाकूने त्याच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला, असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Pune police has solved the murder case that took place near mandai metro

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 04:47 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • cmomaharashtra
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
1

रक्ताच्या नात्याला काळिमा! भावानेच केला बहिणीचा खून; न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून
2

Baramati dubble Murder Case: शेरेवाडीत मध्यरात्री दुहेरी हत्याकांड: गळा चिरून माजी सरपंचाचा खून

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप
3

Crime News: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर निधीच्या मृत्यूने खळबळ; आईने केले गंभीर आरोप

Baramati Crime: माळेगाव हादरले! गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला
4

Baramati Crime: माळेगाव हादरले! गजबजलेल्या राजहंस चौकात दोन तरुणांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.