Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; आयुक्तांच्या आदेशानंतर टपर्‍या टाकल्या उखडून

पोलीस आयुक्तांनी शाळा व महाविद्यालय परिसरात १०० मिटर अंतरावर असलेल्या टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर अवघ्या तासाभरात टपऱ्यांवर कारवाई केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 30, 2025 | 02:50 PM
पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; आयुक्तांच्या आदेशानंतर टपर्‍या टाकल्या उखडून

पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; आयुक्तांच्या आदेशानंतर टपर्‍या टाकल्या उखडून

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : आयटी कंपन्या तसेच आयटी तरुण-तरुणींना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्तांनी शाळा व महाविद्यालय परिसरात १०० मिटर अंतरावर असलेल्या टपऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर अवघ्या तासाभरात या टपऱ्यांवर कारवाई केली गेली. हडपसर तसेच काळेपडळ पोलिसांनी ही कारवाई केली असून, शहरात देखील आता शाळा परिसरात १०० मिटर अंतरात असलेल्या टपर्‍या रडारवर आल्या आहेत. त्यावरही तोडफोड कारवाई केली जाणार आहे.

शाळा तसेच महाविद्यालयाच्या शंभर मिटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास कायद्याने बंदी आहे. परंतु, शहरात अनेक भागात टपऱ्या मोठ्या प्रमाणात आहेत. अनेकवेळा कारवाईचा दिखावा पालिकेकडून केला जातो. अनधिकृत म्हणून ही कारवाई केली जाते. परंतु, ठोस अशी कारवाई होत नव्हती. दरम्यान, नुकताच पोलीस आयुक्तांनी मगरपट्टा येथे आयटी कंपनी व आयटीच्या तरुण-तरुणींना मार्गदर्शन केले. त्यांना ड्रग्जचा धोका तसेच त्याबाबत माहिती देण्याचे आवाहन केले होते.

टपऱ्यांवरील कारवाईच्या आदेशानंतर हडपसर तसेच काळेपडळ पोलिसांनी हद्दीतील शाळा परिसरात मागील बाजूस तसेच कडवस्ती परिसरात असलेल्या शाळेच्या आवारातील तीन पान टपर्‍यांवर कारवाई केली. संबंधीत पान टपरी चालकांवर कोफ्ता कायद्यान्वये कारवाई केली. ही कारवाई हडपसर पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर काळेपडळ पोलिसांनी मोहम्मदवाडी परिसरातील रहेजा विस्टा येथील टपर्‍यांवर कारवाई करत गुन्हे दाखल केले. शाळ परिसरात अशा टपर्‍या सुरू करून तेथे तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करणार्‍यांवर कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा : तासगाव पोलिसांनी सराईत चोरट्याला पकडले; तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

शाळांच्या परिसरातील टपर्‍या उखडून टाका

हडपसर येथील मगपट्टासिटीत आयटी कंपन्या तसेच त्यात काम करणाऱ्या तरुण-तरुणींसोबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पोलीस आयुक्त प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. पुणे शहरातील बहुसंख्य शाळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टपर्‍या सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याच टपर्‍यावर शाळकरी मुले येरजार्‍या मारताना तसेच सिगारेट सारखी व्यसने करतना आढळून आले आहे. याकडे नागरिकांनी प्रश्नाद्वारे पोलीस आयुक्तांचे लक्ष वेधले. त्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शाळांच्या शंभर मिटर परिसरातील अनिधिकृत टपर्‍या उखडून टाकण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले आहेत. पोलिस आयुक्तांनी धडक आदेश देताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

हे सुद्धा वाचा : सोशल मिडीया वापरताना लक्ष्मण रेषा आखून घ्या; पोलीस आयुक्तांचे तरूण- तरूणींना अवाहन

Web Title: Pune police has started taking action against the paan stall nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • Amitesh Kumar
  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • maharashtra

संबंधित बातम्या

MHADA lottery : घराचे स्वप्न साकार होणार! म्हाडा कोकण मंडळातर्फे 5354 घरांच्या सोडतीची तारीख ठरली, ‘या’ दिवशी होणार लॉटरी
1

MHADA lottery : घराचे स्वप्न साकार होणार! म्हाडा कोकण मंडळातर्फे 5354 घरांच्या सोडतीची तारीख ठरली, ‘या’ दिवशी होणार लॉटरी

महाभोंडला अन् भव्य लकी ड्रॅा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; साळेगावकरांच्या वतीने हजारो महिलांना बक्षिसांचे वाटप
2

महाभोंडला अन् भव्य लकी ड्रॅा कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; साळेगावकरांच्या वतीने हजारो महिलांना बक्षिसांचे वाटप

World Post Day 2025 : ‘पोस्टमन’ बनला डिजिटल दूत; वाढत्या तंत्रज्ञानामुळे टपाल खातं बदलतंय
3

World Post Day 2025 : ‘पोस्टमन’ बनला डिजिटल दूत; वाढत्या तंत्रज्ञानामुळे टपाल खातं बदलतंय

खासगीकरणाच्या विरोधात महावितरण कर्मचारी संपावर! तीनही वीज कंपन्याचा डोलारा हा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अंगाशी येणार
4

खासगीकरणाच्या विरोधात महावितरण कर्मचारी संपावर! तीनही वीज कंपन्याचा डोलारा हा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अंगाशी येणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.