Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणेकरांनो सावधान! सीसीटीव्ही पाहतोय; साडेतेरा लाख वाहनांवर पोलिसांची कारवाई

बेशिस्त वाहनचालकांविरोधात शहर पोलिसांचा वाहतूक विभाग प्रंचड आक्रमक झाल्याचे कारवाईतून दिसत असून, सीसीटीव्ही माध्यमातून पोलिसांनी तब्बल साडे तेरा लाख वाहनांवर कारवाई केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 15, 2025 | 12:31 AM
पुणेकरांनो सावधान! सीसीटीव्ही पाहतोय; साडेतेरा लाख वाहनांवर पोलिसांची कारवाई

पुणेकरांनो सावधान! सीसीटीव्ही पाहतोय; साडेतेरा लाख वाहनांवर पोलिसांची कारवाई

Follow Us
Close
Follow Us:
  • पुणेकरांनो सावधान! सीसीटीव्ही पाहतोय
  • साडेतेरा लाख वाहनांवर पोलिसांची कारवाई
  • १०३ कोटी रुपयांचा दंड आकारला
पुणे/अक्षय फाटक : बेशिस्त वाहनचालकांविरोधात शहर पोलिसांचा वाहतूक विभाग प्रंचड आक्रमक झाल्याचे कारवाईतून दिसत असून, सीसीटीव्ही माध्यमातून पोलिसांनी तब्बल साडे तेरा लाख वाहनांवर कारवाई केली आहे. अवघ्या वर्षभरात ही कारवाई झाली असून, या कारवाईतून तब्बल १०३ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांनो सावधान, सीसीटीव्ही पाहतोय, अशीच म्हणण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे पोलिसांची भूमिका आक्रमक असली तरी नियमभंग करणाऱ्यांची वाढती संख्या देखील वर्षाला वाढत असल्याचे दिसत आहे.

पुणे शहरातील वाहतूक कोंडीने पुणेकर हैराण झालेले आहेत. सकाळी आणि सायंकाळी तर वाहन चालकांना ‘मुंगी वाट’ काढून इच्छितस्थळी पोहचत आहेत. रस्त्यांची आवस्था गेल्या वर्षाभरात भीषणच होती. एकीकडे वाहतूक कोंडीचा त्रास असताना दुसरीकडे वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा जोर देखील सोसावा लागत असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून दिसत आहे. पोलिस रस्त्यावर उभा राहून वाहतूक कोंडी सोडविण्यापेक्षा तिसऱ्या डोळ्यातील म्हणजे, सीसीटीव्हीतून प्रचंड कारवाया करत असल्याचे दिसत आहे. शहर सुरक्षेसाठी लावलेला तिसरा डोळा सुरक्षेपेक्षा वाहतूक पोलिसांना कारवाईसाठी मोठा फायदेशीर ठरत असल्याचेही नागरिक बोलत आहेत.

वाहतूक पोलिसांनी १ जानेवारी ते १ डिसेंबर २०२५ या कालावधीत राँग साइडने वाहन चालविण्याच्या प्रकारावर सर्वाधिक म्हणजेच ५ लाख ९ हजार ८४३ कारवाया केल्या आहेत. दरवर्षी हेल्मेट न घालणे हा प्रमुख नियमभंग होता, यंदा प्रथमच राँग साइड आणि नो-एंट्री उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. दोन्ही गोष्टींमुळे थेट अपघातांला आमंत्रण देणारे प्रकार असल्याने त्यावर मोठी कारवाई सुरू आहे.

हेल्मेट कारवाईच्या जोडीला मागील दोन वर्षांत टोइंगची कारवाई मोठ्या प्रमाणात होत होती. यंदाही ४ लाख ७९ हजार ४३६ वाहने टोइंग करण्यात आली. याशिवाय सिग्नल न पाळणे, वाहन चालविताना मोबाईल वापरणे, धोकादायक ड्रायव्हिंग अशा विविध नियमभंगांवरही कडक कारवाई झाली आहे. मात्र, साडेतेरा लाख कारवायांपैकी केवळ ४ लाख ६४ हजार २३५ वाहनचालकांनीच दंड भरला आहे. उर्वरित ८ लाख ८९ हजार २७९ जणांकडील दंड अद्याप थकित आहे.

तंत्रज्ञानामुळे नियमभंग टिपला जात असला, तरी दंड वसुलीचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे. राँग साइडने वाहन चालविणाऱ्यांवर आता केवळ दंड नव्हे, तर थेट गुन्हे दाखल करण्याची कठोर भूमिका घेण्यात आली आहे. मागील पंधरा दिवसात १०० हून अधिक वाहनचालकांवर गुन्हे दाखल झाले असून, आतापर्यंत ही संख्या २०० च्या पुढे गेली आहे.

२०२५ मधील कारवाया (एक जानेवारी ते एक डिसेंबर)

   
राँग साइड ड्रायव्हिंग ५,०९,८४३
टोइंग कारवाई ४,७९,४३६
सिग्नल न पाळणे १,५९,११०
वाहन चालविताना मोबाइलचा वापर ३९,१८८
धोकादायक ड्रायव्हिंग ३६,६४०
कारच्या काचांना काळी फिल्मिंग १६,९७५
साइड मिरर नसणे १५,९७३
सीटबेल्टचा वापर न करणे १३,२४२
ड्रँक अँड ड्राइव्ह ५६७२
हेल्मेट कारवाई ५४२६
दुचाकीच्या सायलेंसरमध्ये बदल ३००७
अन्य कारवाई ६९,००२

Web Title: Pune police has taken major action against vehicles violating rules in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 12:31 AM

Topics:  

  • pune news
  • Pune Police
  • Pune Traffic Police

संबंधित बातम्या

काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवली
1

काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवली

मुळा मुठेच्या किनारी ज्ञानयज्ञ, पुण्यात ग्रंथांची पेठ उभी; पुणे पुस्तक महोत्सवात विश्वास पाटील यांचे विचार
2

मुळा मुठेच्या किनारी ज्ञानयज्ञ, पुण्यात ग्रंथांची पेठ उभी; पुणे पुस्तक महोत्सवात विश्वास पाटील यांचे विचार

Pune Election : उमेदवारी देण्यासाठी भाजपच्या नेत्यांची होणार दमछाक; 165 जागांसाठी 2500 जणांच्या मुलाखती
3

Pune Election : उमेदवारी देण्यासाठी भाजपच्या नेत्यांची होणार दमछाक; 165 जागांसाठी 2500 जणांच्या मुलाखती

Maharashtra Politics: भाजपच्या ‘फास्ट ट्रॅक’ मुलाखतींमुळे इच्छुकांमध्ये धाकधूक; ४१ प्रभाग अन् २५००…
4

Maharashtra Politics: भाजपच्या ‘फास्ट ट्रॅक’ मुलाखतींमुळे इच्छुकांमध्ये धाकधूक; ४१ प्रभाग अन् २५००…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.