Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात तापमानाचा पारा 35 अंशांवर; उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता

शहर आणि परिसरात मंगळवारी (दि.१०) १६.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान तर ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. आकाश मुख्यतः निरभ्र होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 11, 2026 | 11:43 AM
पुण्यात तापमानाचा पारा 35 अंशांवर; उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता

पुण्यात तापमानाचा पारा 35 अंशांवर; उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. बहुतांश भागात पारा 36 अंशांच्या पुढे गेला असून, मार्च महिन्यात उन्हाचा कडाका वाढला आहे.

शहर आणि परिसरात मंगळवारी (दि.१०) १६.३ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान तर ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. आकाश मुख्यतः निरभ्र होते. मात्र, बुधवारी (दि.11) तापमानामध्ये वाढ झाली असल्याने सकाळपासूनच पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पुणे आणि परिसरात बुधवारी (ता.११) किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान स्थिर राहण्याचा अंदाज होता. त्यामुळे तापमानात घट झाल्याचे पाहिला मिळत आहे.

हेदेखील वाचा : Pune Traffic News : पुणे होणार ट्रॅफिकमुक्त ! नितीन गडकरींकडून ४५ हजार कोटींच्या ६ महाप्रकल्पांची घोषणा

पुण्यात कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर १६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तसेच गुरुवारपासून (ता. १२) कमाल तापमानात पुढील दोन दिवस घट होण्याची शक्यता असून, ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.

शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

अचानक वाढलेल्या तापमानामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला यांसारख्या रब्बी पिकांवर ताण येत आहे. पिकांची वाढ खुंटणे, दाणे भरण्याची प्रक्रिया अपूर्ण राहणे, त्यामुळे उत्पादनात घट येऊ शकते. फुलगळ व पानगळ वाढणे, उष्णतेमुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत असून, शेतकऱ्यांना पिकांना अतिरिक्त पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे वीज वापर आणि इतर खर्च वाढत आहे.

अमरावती, अकोल्यात उष्णतेची लाट कायम?

विदर्भासह बिहार, झारखंड व छत्तीसगड या भागावर सध्या कमी दाबाचा द्रोणीय पट्टा सक्रिय असून पश्चिम हिमालयावर पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव दिसून येत आहे. या हवामान स्थितीमुळे विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सध्या विदर्भातील कमाल तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असून, किमान तापमान १९ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. भारतीय हवामाना विभागाच्या अंदाजानुसार बुधवारी अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

Web Title: Temperature in pune at 35 degrees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • Climate Change
  • pune news
  • Weather Update

संबंधित बातम्या

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
1

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार
2

El Nino : 70 वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट; सप्टेंबरपासून सुपर अल नीनोचा प्रभाव जाणवणार

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
3

Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले
4

सणासुदीच्या मुहूर्तावर नारळाला मागणी वाढली; मागणी वाढताच दरही कडाडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.