Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिवेगाने गाडी चालवणे थांबवा नाही तर…; पुणे पोलिसांनी Accident रोखण्यासाठी वडगाव-लोणावळ्यात…

तिवेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पारंपरिक पद्धतींना मर्यादा येत असल्याने नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्ते सुरक्षितता वाढविण्याच्या उद्देशाने पुणे ग्रामीण पोलिसांनी लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा वापर सुरू केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 11, 2026 | 04:41 PM
अतिवेगाने गाडी चालवणे थांबवा नाही तर…; पुणे पोलिसांनी Accident रोखण्यासाठी वडगाव-लोणावळ्यात…
Follow Us
Close
Follow Us:

अतिवेगावर नियंत्रणासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची नवी मोहीम
वडगाव-लोणावळ्यात स्पीड कॅमेरे
वेगमर्यादा न पाळल्यामुळे वाढली अपघातांची संख्या

वडगाव मावळ:
महामार्गावर वेगमर्यादा न पाळल्यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Police) लेझर स्पीड कॅमेऱ्याचा वापर सुरू केला आहे. मावळ तालुक्यातील वडगाव मावळ आणि लोणावळा येथील पोलिस ठाण्यांना पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या हस्ते लेझर स्पीड कॅमेरे सुपूर्द करण्यात आले.

जी.आर.एस.पी. व बी.आय.जी.आर.एस. या संस्थांच्या सहकार्याने पुणे ग्रामीण पोलिसांना हे कॅमेरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोणपे, पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख, शंकर पाटील, संतोष जाधव, तसेच संस्थेच्या प्रमुख कांचन आवटे उपस्थित होते. लोणावळा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, वडगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कैलास कदम आणि वाहतूक पोलिस हवालदार चौधरी यांच्याकडे संबंधित कॅमेरे सुपूर्द करण्यात आले.

Pune Accident: पुण्यात हिट अँड रनचा कहर; मॉर्निंग वॉकला निघालेल्या 65 वर्षीय महिलेचा भरधाव कारने चिरडून मृत्यू

दोन वर्षांत ग्रामीण भागात ५७ प्राणघातक अपघात
मागील दोन वर्षांच्या अहवालानुसार पुणे जिल्ह्यातील प्राणघातक अपघातांपैकी ५७ अपघात ग्रामीण भागात नोंदवले गेले आहेत. अतिवेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पारंपरिक पद्धतींना मर्यादा येत असल्याने नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने रस्ते सुरक्षितता वाढविण्याच्या उद्देशाने पुणे ग्रामीण पोलिसांनी लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा वापर सुरू केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर पुणे ग्रामीणमधील महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवर या कॅमेऱ्यांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

रस्ते सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे पाऊल
फिलान्थ्रॉपीज इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी अंतर्गत भागीदार असलेल्या ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशिप यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत जुन्या मुंबई–पुणे महामार्गासह पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी स्पीड कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी होण्यास मदत होणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.

Dharashiv Accident: टायर फुटल्याने भरधाव कार चहाच्या टपरीत घुसली; धाराशिवमध्ये माजी नगरसेवकासह दोघांचा मृत्यू

पुणे ग्रामीण भागात अतिवेग हे अपघातांचे प्रमुख कारण ठरत असून यात दुचाकीस्वार व पादचारी यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे लेझर स्पीड कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अतिवेगावर प्रभावी नियंत्रण ठेवता येणार असून जनजागृती मोहिमेसह या उपक्रमामुळे अपघात व मृत्यूंची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे मत पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी व्यक्त केले.

Web Title: Pune rural police take speed cameras help to control accident in mumbai pune express way lonaval maval

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • Accident Case
  • cctv cameras
  • Pune Police
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार
1

Ahilyanagar Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी खोल खड्यात… , 2 ठार

पुणे पोलिस दलात मोठे फेरबदल, तेजस्वी सातपुते गुन्हे शाखेच्या अप्पर आयुक्त; तर संजय दराडे…
2

पुणे पोलिस दलात मोठे फेरबदल, तेजस्वी सातपुते गुन्हे शाखेच्या अप्पर आयुक्त; तर संजय दराडे…

मनसेच्या नेत्याचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; रुग्णालयात केलं दाखल
3

मनसेच्या नेत्याचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; रुग्णालयात केलं दाखल

Pune Police: स्वारगेट पोलिसांच्या हद्दीत ‘संधी’पर्वाचे ‘अवैध धंद्यांना बळ’? गुन्हे शाखेच्या कारवाईने पोलिस दलात खळबळ
4

Pune Police: स्वारगेट पोलिसांच्या हद्दीत ‘संधी’पर्वाचे ‘अवैध धंद्यांना बळ’? गुन्हे शाखेच्या कारवाईने पोलिस दलात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.