Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PCMC News: स्वीकृत सदस्यांसाठी भाजपमध्ये ‘तारीख पे तारीख’; आमदार समर्थकांच्या स्पर्धेत निष्ठावंतांची कोंडी?

शहरात आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, विधान परिषद सदस्य अमित गोरखे, उमा खापरे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे असे विविध गट सक्रिय आहेत. प्रत्येक गटाने आपल्या समर्थकांसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 11, 2026 | 04:15 PM
PCMC, Smart City Scam,

PCMC, Smart City Scam,

Follow Us
Follow Us:
  • १० स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले
  • भाजपमध्ये ७ जागांसाठी तब्बल १५० हून अधिक इच्छुक रिंगणात असल्याने पेच
  • जुने विरुद्ध नवे’ आणि ‘निष्ठावान विरुद्ध समर्थक’ अशा संघर्षामुळे भाजपला अद्याप अंतिम यादी जाहीर करता आलेली नाही
PCMC Politcs: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १० स्वीकृत सदस्य निवडीवरून शहरात राजकीय खलबते वेगाने सुरू आहेत. संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) आपल्या तीन सदस्यांची नावे निश्चित करून प्रशासनाकडे सोपवली असली, तरी भारतीय जनता पक्षामध्ये मात्र अद्याप ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. ७ जागांसाठी तब्बल १५० हून अधिक इच्छुकांनी शड्डू ठोकल्याने निवडीचा चेंडू आता प्रदेश नेतृत्वाच्या कोर्टात गेला असून, भाजपमध्ये ‘जुने विरुद्ध नवे’ आणि ‘आमदार समर्थक विरुद्ध निष्ठावान’ असा संघर्ष टोकाला पोहोचला आहे.

LPG Supply Shortage: गॅस टंचाईमुळे मोबाईल नेटवर्क गायब होणार? ५ मार्चपासून टॉवर कंपन्यांचा गॅस पुरवठा बंद

संख्याबळाचे गणित आणि पक्षीय स्थिती

राज्य शासनाच्या नियमानुसार, १२८ नगरसेवकांच्या सभागृहात प्रति १२.८ नगरसेवकांमागे एक याप्रमाणे १० स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे. यामध्ये:

भाजप: ८४ निवडून आलेले + १ अपक्ष अशा ८५ नगरसेवकांच्या जोरावर ७ जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत.

राष्ट्रवादी: ३७ नगरसेवकांच्या बळावर ३ जागा मिळाल्या आहेत.

शिवसेना: केवळ ६ सदस्य असल्याने तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेला या प्रक्रियेतून बाहेर राहावे लागले आहे.

राष्ट्रवादीचा ‘शह-काटशह’; सीमा सावळेंची एन्ट्री

सभागृहात भाजपच्या बहुमताला रोखण्यासाठी राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपच्या कारभारावर सातत्याने ताशेरे ओढणाऱ्या माजी नगरसेविका सीमा सावळे यांना राष्ट्रवादीने संधी दिली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि युवा नेते पार्थ पवार यांनी सावळेंच्या नावाला पसंती दिली असून, त्यांच्यासोबत फजल शेख आणि राजेंद्र जगताप यांची नावे आयुक्तांकडे सादर करण्यात आली आहेत. शुक्रवारी (दि. १३) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

भाजपसमोर इच्छुकांची ‘फौज’ आणि गटातटाचे राजकारण

भाजपमध्ये ७ जागांसाठी सुरुवातीला ४०० अर्ज आले होते, त्यातील छाननीनंतर १३० नावांची यादी कोअर कमिटीने वरिष्ठांकडे पाठवली आहे. शहरात आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, विधान परिषद सदस्य अमित गोरखे, उमा खापरे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे असे विविध गट सक्रिय आहेत. प्रत्येक गटाने आपल्या समर्थकांसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दुसरीकडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांनीही निष्ठावंतांच्या नावासाठी दबाव वाढवला आहे.

Middle East War : युद्धामुळे जगाचा श्वास कोंडणार? होर्मुज खाडी बंद झाल्यास ‘हे’ मार्ग असतील शेवटचा आधार

स्वीकृत नगरसेवक पदासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आले आहेत. ही यादी वरिष्ठ नेत्यांकडे पाठवण्यात आली असून, चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. पक्षश्रेष्ठींचा आदेश येताच नावे आयुक्तांकडे सादर केली जातील.

— प्रशांत शितोळे, पक्षनेते, महापालिका

 

पुण्याच्या निर्णयामुळे समर्थकांचे धाबे दणाणले

पुणे महापालिकेने स्वीकृत सदस्यांची यादी जाहीर करताना नातेवाइकांना आणि पराभूत उमेदवारांना संधी न देण्याचा नियम पाळला आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही हाच ‘पुणे पॅटर्न’ राबवला जाण्याची शक्यता असल्याने अनेक बड्या नेत्यांच्या समर्थकांचे धाबे दणाणले आहेत. तज्ज्ञ व्यक्तींच्या नियुक्तीऐवजी कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी या जागांचा वापर होत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता शुक्रवारी होणाऱ्या सभेपूर्वी भाजप कोणाच्या गळ्यात माळ घालणार, की पेच कायम राहणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Pcmc co opted member row ncp finalizes candidates bjp struggles with 150 aspirants

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Local Body Election
  • Maharashtra Politics
  • Nationalist Congress Party
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News : छायाचित्रांतील जगलेले क्षण पुन्हा आठवणी जागवतात; प्रियदर्शनी भोर यांचे उद्गार
1

Pune News : छायाचित्रांतील जगलेले क्षण पुन्हा आठवणी जागवतात; प्रियदर्शनी भोर यांचे उद्गार

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात
2

‘महिलांना दडपून ठेवण्याची मानसिकता मनुस्मृतीतून आली, आपला लढा याच मानसिकतेविरुद्ध’; पुण्यात राहुल गांधींचा घणाघात

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम
3

Pune Sports: ९३५ खेळाडू अन् विजयाचा थरार! ‘विनायकी क्रीडा महोत्सवा’त तायक्वांदो स्पर्धेचा महासंग्राम

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा
4

पुण्यातील सभेत राहुल गांधींनी मांडली महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी, बऱ्याच प्रकरणांची नोंदच होत नसल्याचा केला दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.