Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडकडणाऱ्या विजांचा प्रकाश अन् गुन्हेगाराचा शोध..! भारती विद्यापीठ पोलिसांनी लावला ‘त्या’ खूनाचा छडा

गेल्या महिन्यात (दि. २० मे) आंबेगाव बुद्रुक परिसरातील शहीद कर्नल पाटील पेट्रोल पंप ते म्हशीचा गोठा रोडवरील सर्व्हिस रोडलगत पडत्या धो-धो पावसात एका महिलेचा छिन्नविछीन्न अवस्थेत मृतदेह रात्री आढळून आला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 11, 2025 | 08:41 PM
कडकडणाऱ्या विजांचा प्रकाश अन् गुन्हेगाराचा शोध..! भारती विद्यापीठ पोलिसांनी लावला ‘त्या’ खूनाचा छडा
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  गुन्हेगार आपण पोलिसांना सापडणार नाहीत, या भावनेतूनच गुन्हा करतो अन् निर्धास्तही राहतो. पोलीसही आपले ‘पण’ लावून गुन्हेगाराचा शोध लावतात हे भारती विद्यापीठ पोलिसांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. कडकडणाऱ्या विजांच्या प्रकाशातून एका खूनाच्या गुन्ह्याचा छडा लावत पोलिसांनी गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, २० दिवस, ३२० सीसीटीव्ही, १२०० रिक्षा आणि दीडशे गुन्हेगार धुंडाळत हे यश पदरी पाडले आहे. एका सराईत गुन्हेगाराकडून आंबेगाव येथील सर्व्हिस रोडच्या कडेला छिन्नविछीन्न अवस्थेत सापडलेल्या महिलेचा खून झाला होता.

या प्रकरणी पोलिसांनी शाहरूख शकील मन्सुर (वय २७, रा. हडपसर, मुळ. उत्तरप्रदेश) अटक केली आहे. घटनेत प्रिती सचिन वाखारे (वय ३१) या महिलेचा खून झाला असून, याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांत अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद आहे. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सावळाराम साळगांवकर तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, सचिन सरपाले, मितेश चोरमोले व त्यांच्या पथकाने केली आहे.

लोणावळा खंडाळा परिसरात चोरीच्या घटनेत वाढ; लाखोंचा ऐवज लंपास, स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण

गेल्या महिन्यात (दि. २० मे) आंबेगाव बुद्रुक परिसरातील शहीद कर्नल पाटील पेट्रोल पंप ते म्हशीचा गोठा रोडवरील सर्व्हिस रोडलगत पडत्या धो-धो पावसात एका महिलेचा छिन्नविछीन्न अवस्थेत मृतदेह रात्री आढळून आला होता. प्रचंड पाऊस पडत असताना नागरिकांना हा प्रकार समोर आला होता. माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी येथे धाव घेतली होती. तेव्हा महिलेवर वारकरून तिचा खून केल्याचे समोर आले होते. प्रथम तिची ओळखही पटली नव्हती. नंतर मात्र, तिची ओळख पटली. पण, तिचा खून कोणी व का केला हे समजू शकत नव्हते. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने संशयित रिक्षा व इतर माहितीवरून आरोपी शाहरूख याच्या मुसक्या आवळल्या. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

असा लागला खूनाचा छडा

घटनेच्या दिवशी प्रचंड पाऊस व कडकडणाऱ्या विजा सुरू होत्या. पोलिसांनी येथील खासगी व पोलिसांशी कनेक्ट असलेले ३२० सीसीटीव्ही तपासले. पण, पाऊस व अंधारामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. परंतु, एका सीसीटीव्हीत पावसात कडकडणारी वीज पडल्यानंतर झालेल्या प्रकाशात महिला एका रिक्षात बसत असल्याचे दिसून आले. मात्र सीसीटीव्हीत रिक्षा अस्पष्ट दिसत होती. केवळ काळे हूड व टीव्हीएसची रिक्षा असल्याचे स्पष्ट झाले. मग, आरटीओकडून टीव्हीएस रिक्षांची माहिती घेतली. तेव्हा शहरात १० हजार ७९४ रिक्षा टीव्हीएस नोंदणीकृत निघाले. पोलिसांनी वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केलेल्या रिक्षांची माहिती घेतली. तेव्हा १२०० रिक्षां समोर आल्या. खात्रीसाठी कात्रज ते नवले पुलावरील आणखी १५० सीसीटीव्ही तपासले. त्यात आरोपीच्या रिक्षा निष्पन्न झाला. त्यानूसार आरोपीची खात्री पटवून त्याला बेड्या ठोकल्या.

Web Title: Pune police have arrested the accused in the murder of a woman in ambegaon crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 08:41 PM

Topics:  

  • crime news
  • Murder Case
  • Pune Police

संबंधित बातम्या

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना
1

Mumbai Crime: ‘डिलिव्हरी बॉय बनून घरात घुसला, चाकूचा धाक दाखवला अन्….’ अंधेरीत धक्कादायक घटना

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर धडक कारवाई; १०.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ आरोपींवर गुन्हे
2

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर तळीरामांवर धडक कारवाई; १०.७१ लाखांचा मुद्देमाल जप्त, ४७ आरोपींवर गुन्हे

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
3

Fake Gutkha Factory: बनावट गुटख्याचा घरगुती कारखाना उद्ध्वस्त! ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा
4

Kolhapur News : पाणीपुरवठा योजनेत भष्टाचार; उद्घाटनापूर्वीच पाण्याच्या टाकीचे तीनतेरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.