Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime News : पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना ठोकल्या बेड्या; पोलिसांनी सापळा रचून पकडले

गुन्हे शाखेच्या युनिट तीनने खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या सराइत गुन्हेगारांकडून दोन पिस्तुले जप्त केली आहेत. लक्ष्मीपुत्र नागेश बडधाळ, राहुल राजु थोरात या दोघांना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 11, 2025 | 12:30 AM
आंतरराज्य सोनसाखळी चोरट्यांना अटक

आंतरराज्य सोनसाखळी चोरट्यांना अटक

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीसंदर्भातील घडामोडी उघडकीस येत असतात. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न सुरु आहेत. मात्र प्रत्येक घटना रोखण्यात पोलिसांनाही यश मिळत नसल्याचे निसून येत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट तीनने गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्यावर कारवाई केली आहे.

खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या सराइत गुन्हेगारांकडून दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी लक्ष्मीपुत्र नागेश बडधाळ (वय २४, रा. हरीतारा सोसायटी, भीमनगर, कोंढवे धावडे), राहुल राजु थोरात (रा. दत्तवाडी, म्हसोबा चौक, पदमगल्ली) यांना अटक केली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस हवालदार मोहम्मद शेख, तुषार किंद्रे, चेतन शिरोळकर, अमित बोडरे, महेंद्र तुपसौंदर आणि पथकाने ही कामगिरी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी विविध कार्यक्रमांनित्त पुणे शहरात आले होते. त्या वेळी गुन्हे शाखेचे युनिट तीनचे पथक गस्त घालत होते. आरोपी लक्ष्मीपुत्र याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमित बोडरे आणि महेंद्र तुपसौंदर यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल जप्त केले. त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा दुसरे पिस्तूल साथीदार राहुल याच्याकडे ठेवण्यास दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी राहुल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त केले. आरोपींनी पिस्तूल का बाळगले ? तसेच त्यांनी पिस्तूल कोणाकडून आणले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.

ज्ञानेश्वर पादुका चौकात एकाला पकडले

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे. अभिषेक राजू टेंकल (वय २३, रा. विष्णुकृपा नगर, शिवाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, प्रमोद मोहिते, महावीर वलटे, सचिन जाधव व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. शिवाजीनगर भागात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी अभिषेक हा ज्ञानेश्वर पादुका चौकात थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस नाईक सचिन जाधव यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्यााच्याकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले.

Web Title: Pune police have arrested two criminals carrying pistols and seized the pistols

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; नेमकं काय घडलं?
1

दौंड नगरपरिषदेत खळबळ! महिला अधिकाऱ्याचा विनयभंग; नेमकं काय घडलं?

Ketan Agarwal Muder Case: लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…
2

Ketan Agarwal Muder Case: लोहगड हत्याकांडाचा थरारक खुलासा; 3 प्लॅन, ‘डेथ पॉईंट’ आणि सिग्नल मिळताच चेतनने…

Bishnoi Gang : बिष्णोई टोळीची सुत्रे हलतात पुण्यातून! गोळीबार अन् दहशतीने व्यावसायिकांमध्ये भिती
3

Bishnoi Gang : बिष्णोई टोळीची सुत्रे हलतात पुण्यातून! गोळीबार अन् दहशतीने व्यावसायिकांमध्ये भिती

Ketan Agarwal Murder Case : मला लग्न करायचं नाही सांगितलं होतं…, सिया गोयलच्या खुलाशाने लोहगड हत्याकांडात खळबळ
4

Ketan Agarwal Murder Case : मला लग्न करायचं नाही सांगितलं होतं…, सिया गोयलच्या खुलाशाने लोहगड हत्याकांडात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.