Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बुधवार पेठ बनली ‘मिनी बांगलादेश’! अकरा महिन्यात तब्बल 103 बांगलादेशींना पकडले

पुण्याच्या बुधवार पेठेने आता भारतातील 'बांगलादेश' अशी ओळख निर्माण केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दर महिन्याला पोलिसांकडून छापा कारवाई करून बांगलादेशी महिला, मुले आणि धक्कादायक म्हणजे, अल्पवयीन मुलांना पकडले जात आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 25, 2026 | 11:27 AM
बुधवार पेठ बनली ‘मिनी बांगलादेश’! अकरा महिन्यात तब्बल 103 बांगलादेशींना पकडले

बुधवार पेठ बनली ‘मिनी बांगलादेश’! अकरा महिन्यात तब्बल 103 बांगलादेशींना पकडले

Follow Us
Follow Us:

पुणे/अक्षय फाटक : पुण्याच्या बुधवार पेठेने आता भारतातील ‘बांगलादेश’ अशी ओळख निर्माण केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दर महिन्याला पोलिसांकडून छापा कारवाई करून बांगलादेशी महिला, मुले आणि धक्कादायक म्हणजे, अल्पवयीन मुलांना पकडले जात आहे. त्यांना याठिकाणी बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड काढून सुव्यवस्थितरित्या इथे पोहचवले जात आहे. विशेष म्हणजे पुण्याचा सुमित चव्हाण याचा मास्टर माईंड असल्याचेही समोर आले आहे. या महिलांना आसाम, पश्चिम बंगाल व झारखंड तसेच उत्तरप्रदेश येथून कागदपत्रे तयारकरून दिली जात असल्याचेही पोलिसांच्या चौकशीतून समोर आलेले आहे. या माहितीनंतर आता पोलिसांकडून एजंट, म्होरके आणि येथील साखळी मोडीत काढण्यासाठी व्यापक पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. २८ एप्रिलपर्यंत बुधवार पेठेतून ३६ बांगलादेशी महिलांना पकडण्यात आले आहे. गेल्या अकरा महिन्यात १०३ बांगलादेशींना पकडण्यात आले आहे.

 

बांगलादेशी मोहिमेत सर्वाधिक कारवाया बुधवार पेठेत होत असल्याचे समोर आले आहे. सातत्याने येथून बांगलादेशी महिलांना पकडण्यात येत आहे. या महिलांना एजंट भारतात आणल्यानंतर बेंगलोर, मुंबई याठिकाणी ठेवून तेथून पु्ण्यात आणत असल्याचे दिसून आले आहे. देशात बेकायदा प्रवेश करून पुण्यापर्यंत पोहचवल्या जात आहेत. त्यांना भारतीय आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील काढून दिले जात असल्याचे वारंवार केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. या महिला बुधवार पेठेतील कुंठण- खान्यात ठेवून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात आहे. पुणे पोलिसांनी गेल्या दोन वर्षापासून या बांगलादेशीविरोधात जोरदार मोहिम राबवली आहे. त्यांना पकडून त्यांच्यावर गुन्हे नोंदवत त्यांची मायदेशी पाठवणी केली जात आहे.

गेल्या वर्षी ८१ बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठविले आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या सूचनेनुसार येथे अचानक कारवाई सुरू आहे. अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाई सातत्याने वाढत असून, बांगलादेशीसोंबतच इतर शहरातील नागरिक देखील बेकायदा पुण्यात वास्तव्य करत असल्याचे दिसून आलेले आहे. पोलिसांनी शहरातील विविध भागात तपास मोहीम, कागदपत्र पडताळणी व गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त कारवाई केली असून मानवी तस्करी आणि देहविक्रीसारख्या गुन्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाई व परत पाठवलेली संख्या
२०२३ –  १८
२०२४-  ५७
२०२५- १०४

२०२३ मध्ये निर्वासितांमध्ये बांगलादेशी नागरिकांची संख्या शून्य होती, तर आफ्रिकन देशांतील २ आणि इतर देशांतील १६ नागरिकांचा समावेश होता. २०२४ मध्ये ही संख्या वाढून एक बांगलादेशी, २५ आफ्रिकन देशांतील नागरिक आणि ३१ इतर देशांतील नागरिकांना निर्वासित केले आहे.

२०२५ मध्ये मात्र बांगलादेशी नागरिकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढून ८१ झाली, तर आफ्रिकन देशांतील ३ आणि इतर देशांतील २० नागरिकांना निर्वासित करण्यात आले. एकूण १०४ जणांवर कारवाई करण्यात आली.

बनावट कागदपत्रे अन् आश्रय

बांगलादेशी नागरिकांना पुण्यात वास्तव्य करताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, यासाठी ते बनावट कागदपत्रे बनवत असल्याचे आढळून आले आहे. आंबेगाव पोलिसांनी एका कारवाईदरम्यान भारतीय रहिवाशी कागदपत्रांसोबतच बांगलादेशाचे कागदपत्रे पकडले होते. या महिलेने भारतीय व्यक्तीसोबत विवाह केला होता. या विवाहानंतर ती दोन वेळा बांगलादेशात देखील जाऊन आल्याचे समोर आले होते.

मोबाईल ॲपद्वारे संपर्क

बांगलादेशी नागरिक त्यांच्या मोबाईलमध्ये एक विशिष्ट ॲप डाउनलोड करून त्यामाध्यमातून बांगलादेशातील नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांशी संपर्क ठेवत होते. पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नागरिकांच्या मोबाईलची तपासणी केली जाणार असून, त्यातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा : CET निकालानंतर मानसिक तणाव, विद्यार्थिनीने राहत्या घरी संपवलं जीवन; पुण्यातील घटना

बांगलादेशींवरील कारवाई दृष्टीक्षेपात

वर्ष शहर व बुधवार पेठ परत पाठवलेले
२०२१ २ ००
२०२२ ०० ००
२०२३ ११ ०७ (शहरातून ५१ जणांना पकडले)
२०२४ ०६ ०३
२०२५ ०८ १६ (शहरातून पकडले १५)
एप्रिल २०२६ ०५ ३६

Web Title: Pune police raid budhwar peth and arrest bangladeshi women

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • Bangladeshi Arrested
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
1

डी. वाय. पाटील बी-स्कूलच्या माजी संचालकावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार
2

पोलिसांनी बुधवार पेठेत तिघांना अडवले, प्रत्येकी 5 हजार मागितले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना
3

मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

Ketan Agrawal Muder : केतनच्या हत्येच्या कटाची माहिती चेतनच्या मित्राला? पोलिसांकडून कसून चौकशी सुरू
4

Ketan Agrawal Muder : केतनच्या हत्येच्या कटाची माहिती चेतनच्या मित्राला? पोलिसांकडून कसून चौकशी सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.