Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्…; पुण्यातील धक्कादायक घटना

एका ट्रक चालकाला धमकावून त्याला लुटत ट्रक घेऊन पसार झालेल्या तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 05, 2026 | 05:40 PM
मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्...; पुण्यातील धक्कादायक घटना

मध्यरात्री नवले पूल परिसरात ट्रक अडवला, चालकाला मारहाण केली अन्...; पुण्यातील धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात लुटमारीच्या घटना वाढल्या असून, अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नवले पूल परिसरात एका ट्रक चालकाला धमकावून त्याला लुटत ट्रक घेऊन पसार झालेल्या तिघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडला होता.

 

आनंद गजानन जामकर (वय २५, रा. सुरेखा पॅलेस, बाणेर), व्यंकटेश महादेव देवणे (वय २२, रा. निर्वाणा पॅलेस, बावधन), स्वराज वैजनाथ टाक (वय २४, रा. सिंहगड काॅलेज कर्मचारी वसाहत, आंबेगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ट्रक चालक २९ वर्षीय तरुणाने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ट्रक चालक तरुण मूळचा पुरंदर तालुक्यातील नाझरे गावचा रहिवासी आहे. तो शनिवारी (४ जुलै) मध्यरात्री दोनच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरातून कात्रजकडे निघाला होता. कात्रज बाह्यवळण मार्गावर पाठीमागून आरोपी दुचाकीवरुन आले. त्यांनी हॉर्न वाजवून ट्रक थांबविला. ट्रक चालकाला शिवीगाळ करुन केबीनमधून खाली खेचले. नंतर ट्रक चालकाला मारहाण करुन खिशातील १५०० रुपये काढून घेतले. ट्रक चालकाला मारहाण करुन ट्रक ताब्यात घेतला. नंतर आरोपी ट्रक घेऊन पसार झाले.

हे सुद्धा वाचा : मुंबईत BMC च्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी! कुर्ल्यात झाड कोसळून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; मनसैनिक पोलिसांना भिडले

घाबरलेल्या तरुणाने तातडीने याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. भारती विद्यापीठ वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास करुन आरोपींना पकडले. त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, अधिक तपास उपनिरीक्षक मोकाशी करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुण्यात आता चालणंही झालं अवघड; पादचाऱ्याच्या डोक्यात दगड मारुन रोकड नेली पळवून

Web Title: A shocking incident has occurred in pune where thieves robbed a truck driver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या; प्रेयसीला दुसऱ्या तरुणासोबत पाहून झाला वाद अन्…
1

चाकूने भोसकून सराईत गुंडाची हत्या; प्रेयसीला दुसऱ्या तरुणासोबत पाहून झाला वाद अन्…

कान्हे येथे 105 ग्रॅम गांजा जप्त, 55 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; वडगाव मावळ पोलिसांची कारवाई 
2

कान्हे येथे 105 ग्रॅम गांजा जप्त, 55 वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; वडगाव मावळ पोलिसांची कारवाई 

Daund Murder : दौंडमध्ये 70 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने खून; 12 तासात 2 आरोपींना ठोकल्या बेड्या
3

Daund Murder : दौंडमध्ये 70 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने खून; 12 तासात 2 आरोपींना ठोकल्या बेड्या

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई
4

वडगाव मावळात प्रतिबंधित अन्नपदार्थांचा ७.९७ लाखांचा साठा जप्त, दोघांना अटक; अन्न व औषध प्रशासनाची मध्यरात्री धडक कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.