कुत्र्याची शेपुट वाकडी ती वाकडीच! CDF होताच असीम मुनीरची भारताला धमकी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
फातिमा जिना ते इम्रान खान… पाकिस्तानचे नेते ज्यांच्यावर लष्कराने लादला देशद्रोहाचा ठपका, जाणून घ्या
CDF चा पदाभार स्वीकारताच असीम मुनीर यांनी सशस्त्र दलांच्या अधिकाऱ्यांना संबोधित करत भारताला इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या प्रादेशिक अखंडतेला धोका पोहोचवण्याची कोणालाही परवानगी नाही. कोणत्याही देशान आक्रमण केल्यास पाकिस्तान त्याला कठोर प्रत्युत्तर देईल असे मुनीरने म्हटले आहे. सोमवारी (०८ डिसेंबर) पाकिस्तानच्या GHQ येथे गार्ड ऑफ ऑनरेन असीम मुनीरला सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी अधिकऱ्यांना संबोधित करत ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) चा उल्लेख करत त्यांनी भारताला धमकी दिली.
मुनीर यांनी पाकिस्तानला शांतता प्रिय देश म्हणून वर्णन केले. त्यांनी म्हटले की, त्यांच्या देशाच्या सार्वभौमत्वाला, प्रादेशिक अखंडतेला कोणीही धोका निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर हे सहन केले जाणार नाही असा इशारा त्यांनी दिली. तसेच पाकिस्तान प्रत्येक धोक्याला प्रत्युत्तर देईल असे त्यांनी म्हटले.
याशिवाय मुनीरने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील (Afghanistan) संघर्षावर भाष्य केले. त्यांनी तालिबान राजवटीला देखील त्यांच्याकडे केवळ फितना अल-खवारीज (TTP) आणि पाकिस्तान पैकी एकाला निवडावे लागेल. पाकिस्तान सरकारने टीटीपीवर गेल्या वर्षी बंदी घातली आहे.
पाकिस्तानने लष्करात मोठा फेरबदल केला आहे. असीम मुनीर यांना सर्व संरक्षण दलांचे प्रमुख (CDF) म्हणून नियुक्त करण्यात आले असून त्यांच्याकडे भू-दल, हवाई दल आणि नौदलाचे ते सर्वोच्च कमांडर बनले आहेत. हा बदल पाकिस्तानमधल्या सैन्य–राजकीय संतुलनासाठी घेण्यात आला आहे. परंतु हे बाब भारतासाठी अत्यंत धोकादायक मानली जात आहे. कारण यामुळे काश्मीर व नियंत्रणरेषेवरील तणाव वाढू शकतो.
Ans: असीम मुनीर यांना सर्व संरक्षण दलांचे प्रमुख (CDF) म्हणून नियुक्त करण्यात आले असून त्यांच्याकडे भू-दल, हवाई दल आणि नौदलाचे ते सर्वोच्च कमांडर बनले आहेत.
Ans: पाकिस्तान हे शांतता प्रिय राष्ट्र असून भारताने हल्ला केल्यास प्रत्युत्तर देण्यात येईल अशी धमकी असीम मुनीर यांनी सीडीएफचे पद हाती येताचा भारताला दिली आहे.






