Bribe News: ८ कोटींची लाच, ३० लाख घेताना अटक; पुण्यातील सोसायटीच्या प्रशासकावर गुन्हा दाखल
काय घडलं नेमकं?
चंदननगर येथील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क येथील गार्डनमध्ये शनिवारी रात्रीच्या वेळी काही तरुण एकत्रित जमले होते. यावेळी काही अज्ञात आरोपींनी १८ वर्षीय सोनू ऊर्फ लखन सकट वाघमारे (रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) या तरुणावर धारदार चाकूने सपासप वार केले. लखन थेट रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यात त्याचे मित्र देखील जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. आरोपी हल्ल्यानंतर घटनास्थळावरून पळून गेले.
तपास सुरु
या घटनेची माहिती चंदननगर पोलिसांना तातडीने देण्यात आली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. ही घटना जुन्या वादातून आणि परिसरातील वर्चस्व वादातून घडली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रावाना केला आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस तपास करत आहे.
नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी ‘तो’ झाला चोर; फुरसुंगी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
नर्तकीवर पैसे उधळण्यासाठी शेजाऱ्याचे घर फोडून सोन्याचा ऐवज चोरी करणाऱ्या एका चोरट्याला फुरसूंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, शेजाऱ्याचेच घर फोडल्याने तसेच नर्तकीसाठी चोर झाल्याने परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. राहुल उत्तम पठारे (वय ३९, रा. होळकरवाडी) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरी केलेले ६ लाख १४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पाच तोळ्याचे दागिणे जप्त करण्यात आले होते. त्याने हे दागिणे एका सोनाराकडे विक्री केले होते.
ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अमोल मोरे, गुन्हे निरीक्षक राजेश खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विष्णू देशमुख व त्यांच्या पथकाने केली आहे. होळकरवाडी येथील राहणारे अभिजित पठारे यांच्या घरात चोरी झाली होती. विवाहाच्या निमित्ताने बाहेरगावी गेल्यानंतर चोरट्याने त्यांच्या घरातून सोन्याचा ऐवज चोरी केला होता. दरम्यान, याप्रकरणी, अभिजित यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फुरसूंगी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस तपास करत होते.
Ans: चंदननगरातील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क परिसरात.
Ans: अज्ञात आरोपींनी चाकूने सपासप वार करून हत्या केली.
Ans: पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.






