Starlink India Update: भारतात वेबसाईट Live आणि टॅरिफ प्लॅन्सही आले समोर, अनलिमिटेड डेटाने वाढवली यूजर्सची उत्सुकता
Free Fire Max: गेममध्ये का होते सतत नव्या ईव्हेंटची एंट्री? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
स्टारलिंक इंडिया वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, भारतातील घरांसाठी प्लॅनची किंमत 8600 रुपये प्रति महिना पासून सुरू होणार आहे. यासोबत कंपनी नवीन कनेक्शन वर एका महिन्याचे ट्रायल देखील ऑफर करणार आहे. ट्रायलदरम्यान जर युजर्सना स्टारलिंकची सर्विस आवडली नाही तर युजर्सना पूर्ण रिफंड मिळणार आहे. स्टारलिंकने दावा केला आहे की, कंपनी भारतातील अशा ठिकाणी देखील हाय स्पीड डेटा ऑफर करणार आहे, ज्या ठिकाणी अद्याप मोबाईल किंवा ब्रॉडबँड सेवा उपलब्ध नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्टारलिंक इंडियाच्या वेबसाइटवर, इंटरनेट सर्व्हिस सुरू करणे आणि त्याची मंथली किंमत किती असेल याबाबत माहिती लाईव्ह झाली आहे. इंटरनेट सर्विसचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना हार्डवेयर किट इंस्टॉल करावी लागणार आहे. याची किंमत 36 हजार रुपये आहे. यासोबतच इंटरनेट प्लॅनबद्दल बोलायचं झालं तर ग्राहकांना प्रति महिना 8600 रुपये खर्च करावे लागणार आहे.
स्टारलिंक इंडियाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 8600 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटा ऑफर केला जाणार आहे. यासोबतच प्रत्येक कनेक्शनवर ग्राहकांना एका महिन्याचे फ्री ट्रायल दिले जाणार आहे. या ट्रायलदरम्यान जर ग्राहकांना इंटरनेट सर्व्हिस आवडली नाही, तर त्यांना पूर्ण रिफंड दिले जाणार आहे.
स्टारलिंकने दावा केला आहे की, त्यांची इंटरनेट कनेक्टिव्हिटी वादळ वाऱ्यात देखील टिकून राहणार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की, ही सिस्टीम कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. त्यामुळे ही सर्व्हिस 99.9 टक्के सूरु असते. स्टारलिंक कोणत्याही परिस्थितीत न थांबता काम करण्यासाठी सज्ज आहे.
स्टारलिंक भारतात लवकरच त्यांची इंटरनेट सर्व्हिस सुरू करणार आहे. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या देण्यात आल्या आहे. यासोबतच कंपनीने भारतात ट्रायल देखील केले आहे.
Ans: Starlink ही SpaceX ची सॅटेलाइट-आधारित इंटरनेट सेवा आहे, जी जगभरात हाय-स्पीड ब्रॉडबँड पुरवते.
Ans: Starlink 50 Mbps ते 220 Mbps दरम्यान इंटरनेट स्पीड देऊ शकते, प्रदेशानुसार बदल होतो.
Ans: होय, Starlink ने भारतात अनलिमिटेड डेटासह प्लॅन्स जाहीर करण्याची तयारी दर्शवली आहे.






