आरशात पाहिल्यानंतर त्वचा डागाळलेली दिसते? मग 'हे' घरगुती उपाय नक्की करून पहा
प्रत्येकाला आपली त्वचा खूप जास्त सुंदर आणि चमकदार हवी असते. त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय केले जातात. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आणि प्रदूषण, धूळ, माती इत्यादींमुळे त्वचा खूप जास्त खराब होऊन जाते. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग, पिंपल्स, ऍक्ने, मुरूम, पुरळ इत्यादी समस्या त्वचा पूर्णपणे निस्तेज करून टाकतात. चेहऱ्यावर काळे डाग, पिग्मेंटेशन, मुरुमांचे व्रण वाढू लागल्यानंतर महिला बाजारातील वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट, स्किन केअर प्रॉडक्ट, स्किन ब्राइटनिंग ट्रीटमेंट इत्यादी अनेक गोष्टी करून घेतात. चेहऱ्यावर वाढलेल्या काळ्या डागांमुळे बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. तसेच काळे डाग घालवण्यासाठी मुली वारंवार मेकअप करतात. पण सतत मेकअप केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते. मेकअप प्रॉडक्टमध्ये असलेले हानिकारक घटक त्वचा पूर्णपणे निस्तेज करून टाकतात. (फोटो सौजन्य – istock)
मुंबईतील 50% कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सतावतेय त्वचेची समस्या, कारणं वाचून डोक्याला लावाल हात
चेहऱ्यावर काळे डाग येण्यामागे अनेक कारण आहेत. सतत सूर्याच्या अतिनील किरणांमध्ये जाऊन बसणे, हार्मोनल बदल, पिग्मेंटेशन, झोपेची कमतरता, चुकीची स्किन केअरचा वापर इत्यादी अनेक गोष्टींमुळे त्वचा खूप जास्त निस्तेज होऊन जाते. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता त्वचेचे गंभीर नुकसान करते. त्यामुळे त्वचा सुंदर ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. आज आम्ही तुम्हाला डागाळलेली त्वचा पुन्हा नव्याने चमकदार आणि सुंदर करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. घरगुती उपाय चेहऱ्यावरील नैसर्गिक ग्लो कायम टिकवून ठेवतात. तसेच चेहऱ्यावर आलेले डाग कमी होऊन त्वचा ब्राईट होते.
चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी तांदळाच्या पाण्याचा वापर करावा. कोरियन स्किन केअर प्रॉडक्टमध्ये तांदळाच्या पाण्याचा वापर केला जातो. ज्यामुळे चेहऱ्यावर आलेले डाग कमी होतात. यासाठी तांदूळ धुतल्यानंतर येणारे स्वच्छ पाणी वाटीमध्ये काढून त्यात कोरफड जेल मिक्स करा. कापसाच्या गोळ्याने तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होईल. तांदळाच्या पाण्यात असलेले नैसर्गिक अँटी ऑक्सिडंट्स त्वचा डागविरहित करतात.
चेहऱ्यावर कोणत्याही महागड्या ब्रँडचे स्किन केअर प्रॉडक्ट लावण्याऐवजी गुलाब पाणी लावावे. गुलाब पाण्याचा वापर करून त्वचा स्वच्छ केल्यास अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतील. याशिवाय चेहऱ्यावर कायमच सौम्य फेसवॉश लावावे. कारण केमिकल प्रॉडक्टच्या वापरामुळे त्वचेचे नुकसान होण्याची शक्यता असते.
चेहऱ्यावर चमकदार ग्लो हवा असेल तर नियमित फळांच्या रसाचे किंवा बीटच्या रसाचे सेवन करावे. बीट, गाजर इत्यादी पदार्थांमध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचा आतून स्वच्छ करतात. तसेच वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात दूध मिक्स करून चेहऱ्यावर लावल्यास त्वचा सुंदर होईल. टॅनिंग आणि पिगमेंटेशनपासून कायमची सुटका होईल.
दैनंदिन जीवनातील रोजच्या सवयी त्वचेचे नुकसान करतात. वारंवार चेहरा धुवणे, पाण्याचे कमी सेवन, सतत तिखट तेलकट पदार्थ खांबे इत्यादी गोष्टींमुळे त्वचा खराब होते. सकाळी उठल्यानंतर त्वचेमधील रक्तप्रवाह सुधरण्यासाठी थंड पाण्याचा वापर करावा. थंड पाण्याच्या वापरामुळे सैल झालेली त्वचा घट्ट होण्यास मदत होते. याशिवाय घराबाहेर पडण्याआधी नियमित सनस्क्रीन लावावे. यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण होते.






