crime (फोटो सौजन्य: social media)
दिवसेंदिवस पुणे शहरात गुन्हेगारी वाढत चालली आहे. घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ होतांना दिसत आहे. साथीदारासह पहाटेच्या वेळी घरात शिरून मोबाईल आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या महिलेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. ही घटना कर्वेनगर भागात घडली आहे. पहाटेच्या सुमारास महिला आणि तिचे साथीदार घराच्या आत डोकावत महिलेने चार मोबाईल फोन आणि रोकड चोरी केल्याची घटना समोर आली आहे. मुरलीधर आंगरे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिल्यानंतर वारजे पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कर्वेनगर भागात एका महिलेने घराच्या आत डोकावत चार मोबाईल आणि रोकड चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात समोर आली आहे. ही घटना १५ जून रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास तक्रारदार मुरलीधर अंगारे घरी नसतांना घडली आहे. तक्रारदार व्यवसायासाठी बाहेर गेले असता त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांचे मोबाईल चोरीला गेल्याची घटना दुधाने हाइट्स येथे घडली. फिर्यादी मुरलीधर आंगरे यांच्या घराखालीच डेअरी आणि हॉटेलचा व्यवसाय आहे . फिर्यादींच्या घरी काही पाहुणे आले होते .पहाटेच्या वेळी दार उघडे असल्याचे पाहून चोरट्यांनी डाव साधला .फिर्यादी यांच्या पत्नीकडे काम करत असल्यामुळे त्यांनी तिला फोन लावला असता तो बंद लागला .नंतर शोधाशोध केल्यानंतरही फोन मिळाला नसल्याचे लक्षात आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली .त्यानंतर आपल्या घरी चोरी झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलीस ठाण्यात धाव घेतली .या घटनेनंतर वारजे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय .
सीसीटीव्हीत काय ?
चोरी करतांना महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यावरून चोर महिलेला ओळखण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वारजे पोलीस ठाण्यात अज्ञात महिला चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे घटनेच्या तपासात समोर आलेल्या सीसीटीव्हीत कॅमेरात, एक महिला अपार्टमेंटमध्ये जाताना दिसते . घरांमध्ये डोकावत एकूण चार मोबाईल ती आपल्या ड्रेसमध्ये लपवत असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे .
दागिने घ्यायचे म्हणून आल्या अन् सोन्याची अंगठी घेऊन…