राज्यभरात भ्रष्टाचाराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) धडक कारवाया करत असून, एकामागून एक धक्कादायक प्रकरणे समोर येत आहेत. पोलिसांपासून ते प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत अनेकजण एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. आता भंडारा आणि परभणीमध्ये लाच घेतांना सह पोलीस निरीक्षक आणि २ पोलीस कर्मचाऱ्यांवर एसीबीने कारवाई केली आहे.
दागिने घ्यायचे म्हणून आल्या अन् सोन्याची अंगठी घेऊन…
पोलिस नायकाला लाच घेतांना रंगेहात अटक
भंडाऱ्यात पवनी पोलीस ठाण्याचे पोलिस नायक अजित वाहने (वय 37) यांनी तडीपारी अथवा अन्य प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी एका फिर्यादीकडून 10 हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित नागरिकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार केली होती. एसीबीने दोन दिवस पडताळणी केल्यानंतर सापळा रचून अजित वाहने यांना पंचासमक्ष लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवतांना रंगेहात पकडलं. त्यांच्याविरुद्ध पवनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
परभणीत पोलिस ठाण्यातच लाचखोरी
परभणी जिल्ह्यातील पालम पोलिस ठाण्यात आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. एका प्रकरणात तक्रारदाराकडून 10 हजार रुपयांची लाच घेताना पालम पोलिस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक व दोन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई परभणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. या प्रकरणातही सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडण्यात आलं असून, तिघांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाच घेतांना उपजिल्हाधिकाऱ्यास अटक
काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला. उपजिल्हाधिकाऱ्यांनी शेतजमिनीच्या प्रकरणात तब्बल 41 लाखांची लाच मागितली होती. त्यापैकी 23 लाख रुपये आधीच स्वीकारले गेले होते, आणि उर्वरित 18 लाखांसाठी तक्रारदाराकडून आग्रह होत होता. तक्रारदाराने अखेर एसीबीकडे धाव घेतली.सापळा रचून उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना 5 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. यामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती.
महापालिकेचे उपायुक्त 7 लाखांच्या लाचप्रकरणी अडचणीत
सांगली महापालिकेच्या उपायुक्त वैभव साबळे यांनी एका 24 मजली इमारतीच्या परवान्यासाठी थेट 10 लाखांची लाच मागितली. तडजोडीनंतर 7 लाख रुपये देण्यावर करार झाला. यावर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली.सापळ्यानंतर उपायुक्त वैभव साबळे यांनी 7 लाखांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने, विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मोठी बातमी! २० वर्षीय मुलीवर १० जणांनी केला आळीपाळीने बलात्कार; अटक झालेल्यामधे ४ अल्पवयीन