Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nasrapur crime News: खटला ‘फास्ट ट्रॅक’वर चालवणार! पोलीस अधीक्षक संदीप गील यांची नसरापूरकरांना ग्वाही

पुणे ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणात आरोपीला ताब्यात घेऊन त्याचे रात्रीत मेडिकल केले. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले. दरम्यान, त्याने नेमके चिमुरडीला कसे मारले हे मात्र समजू शकलेले नाही.

  • By anuradha sagar
Updated On: May 02, 2026 | 04:57 PM
Nasrapur Child Abuse Case Pune, Pune Satara Highway Rasta Roko, SP Sandeep Gill,

Nasrapur Child Abuse Case Pune, Pune Satara Highway Rasta Roko, SP Sandeep Gill,

Follow Us
Follow Us:
  • आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे हा मूळचा शेतमजूर
  • आरोपीवर यापूर्वी १९९८ आणि २०१५ मध्ये विनयभंगाचे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले
  • आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
Nasrapur crime News: नसरापूर येथील चिमुरडीच्या लैंगिक अत्याचारप्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष पथकाची नेमणूक केली असून, हा खटला जलदगती न्यायालयात (फास्ट ट्रॅक) चालविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, माहिती पोलिस अधीक्षक संदीप गिल्ल यांनी दिली.

नसरापूर गावात चिमुरडीवर अत्याचारप्रकरणात नराधम आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे.

Nasrapur Crime News: चिमुरडीवरील अत्याचारानंतर भोर तालुक्यात जनक्षोभ; पुणे-सातारा महामार्ग रोखला

भीमराव कांबळे हा शेतमजूर असून, मिळेल ते कामे करतो. नसरापूर गावात देखील तो कामानिमित्त आलेला होता. तो मिळेल तो कामे करत भोरमधील वेगवेगळ्या गावात फिरत असतो. मात्र, त्याने शुक्रवारी घृणास्पदप्रकार केला. दरम्यान, कांबळे याच्यावर यापुर्वीचेही दोन विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. एक गुन्हा हा १९९८ चा तर दुसरा गुन्हा २०१५ मधील असल्याचे समोर आले आहे. या दोन्ही गुन्ह्यात त्याला दोषमुक्त करण्यात आले आहे हे विशेष!

पुणे ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणात आरोपीला ताब्यात घेऊन त्याचे रात्रीत मेडिकल केले. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले. दरम्यान, त्याने नेमके चिमुरडीला कसे मारले हे मात्र समजू शकलेले नाही. त्यासंदंर्भात पोलिस तपास करत असून, सीसीटीव्हीत आरोपी चिमुरडीला सोबत घेऊन गोठ्यात शिरताना दिसून आला आहे. मुलगी आजीच्या घराजवळ खेळत होती. तेथून गोठा जवळपास अर्धा किलोमिटर आहे. त्यामुळे त्याने नेमके कशाचे आमिष दाखवून मुलीला त्याने इथपर्यंत आणले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Pune Crime : भयावह कृत्य! 65 वर्षीय नराधमाकडून 4 वर्षीय

नसरापूरमध्ये नेमकं काय झालं ?

पुण्यातील रहिवशी असलेली चिमुरडी आजीकडे नसरापूर येथे सुट्टीसाठी आली होती. पण, खेळताना ती बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर नातेवाईक व नागरिकांनी शोध घेतला. पण, ती सापडत नसतानाच पोलिसांना दुपारी सव्वा पाचच्या सुमारास याची माहिती मिळाली. पोलिसांनी परिसरातील खासगी सीसीटीव्ही तपासले असता, आरोपी चिमुकलीला घेऊन जाताना स्पष्टपणे दिसून आला. दरम्यान, याघटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि भोर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली. ग्रामस्थ अचानक एकत्र जमा झाले तीव्र संतापाची लाट पसरली. आणि ग्रामस्थ पुणे-सातारा महामार्गावर जमा झाले. त्यांनी रास्ता रोको करत आंदोलन सुरू केले. जवळपास दोन ते अडीच तास रस्ता अडवून धरल्यानंतर महामार्ग जाम झाला होता. घोषणाबाजी करत नागरिकांनी आरोपीला फाशी द्या, त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली.

 

 

Web Title: Pune rural police to fast track nasrapur case sp sandeep gill promises stern action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Bhor Crime
  • crime news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा
1

Pune Crime: हत्या कशी करावी ते चौकशीत कसे वागावे; केतन प्रकरणात आरोपींच्या ऑनलाइन सर्चचा खुलासा

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत
2

Sahil Wakode IIT Bombay Suicide Case: साहिलसोबतच्या ‘शेवटच्या भेटीत नक्की काय घडलं?’ जवळच्या मित्राने सांगितली हकीकत

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक
3

Delhi Crime: रस्त्यात धक्का लागला अन् वाद वाढला; चाकूहल्ल्याच्या प्रकरणात दोन अल्पवयीनांसह तिघांना अटक

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.