उत्तर प्रदेशातील येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम विवाहातून केल्याने तरुणीच्या पाच भावांनी मिळून आपल्या बहीण आणि भाऊजीची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या केलेल्या तरुणीचे नाव मुन्नी गुप्ता असे आहे तर तरुणाचे नाव दुखन साव असे आहे. हत्या केल्या नंतर मृतदेह जंगलात फेकून दिले. हि घटना उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात घडली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी मुन्नी गुप्ता आणि तरुण दुखन साव यांचे एकमेकांशी प्रेमसंबंध होते. पण कुटुंबियांचा त्यांच्या नातेसंबंधाला विरोध होता. लग्नानंतर दोघेही गुजरातला राहू लागले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी दोघांनाही सांगितलं की, तुम्ही परत या आम्ही तुमचं धुमधडाक्यात लग्न लावून देतो.
मुन्नी गुप्ता आणि दुखन साव हे गुजरातहून मिर्झापूरला आले. तिथे मुन्नी हीच भाऊ त्यांना घेण्यासाठी आला. भावांनी मिळून आधीच एक कट रचला होता. त्या कटानुसार, मुन्नी आणि दुखन यांना गाडीत बसवून बिहारच्या दिशेने नेण्यात आले. त्यानांतर आरोपींनी हाथिनाला परिसरातील काही गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी मुन्नी आणि दुखनची हत्या करण्यात आली. त्यांनतर मृतदेह हा एका पोलीस ठाण्यातील हद्दीतील झाडीत फेकून देण्यात आला होता.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पाच भावांपैकी अवधेश, राजेश आणि मुकेश हे तिघेजण घटनास्थळावरून फरार झाले. तसेच यातील मुन्ना आणि राहुल या दोघांना अटक करण्यात आली आहे.
विवाहित महिलेने तरुणाच्या गुप्तांगावर केला चाकूने हल्ला
एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने एका तरुणाला घरात बोलवून त्याच्या गुप्तांगावर चाकूने हल्ला केल्याचे समोर आले आहे. यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर हल्ला झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात तडफडू लागला. तरुणाच्या व्हिवळण्याच्या आवाज ऐकून शेजारी पोहोचले. त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र तरुणाची प्रकृती गंभीर जखमी असल्याने त्याला वाराणसी येथील रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून चौकशी करण्यात येत आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील आहे.
चाकूने भोसकून एकाची हत्या; सात वर्षांनी कोर्टाने आरोपीला सुनावली ‘ही’ शिक्षा