Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CBI अधिकारी असल्याचं भासवून पुण्यातील तरुणाची 42 लाखांची सायबर फसवणूक; स्काईप ॲपवरून कॉल

पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणाला तब्बल ४२ लाख ९५ हजार रुपयांनी सायबर चोरट्यांनी गंडवले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. CBI अधिकारी असल्याचे भासवून ही रक्कम हडप करण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 05, 2025 | 09:35 AM
PUNE (फोटो सौजन्य : PINTEREST)

PUNE (फोटो सौजन्य : PINTEREST)

Follow Us
Follow Us:

पुण्यात बाणेरमधील एका 23 वर्षीय तरुणाला सायबर चोरट्यांनी तब्बल 42 लाख 95 हजार रुपयांना गंडवले असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करून या तरुणावर दिल्लीमध्ये 50 खटले दाखल असल्याचा खोटा दावा करत त्याच्याकडून बँक तपशील घेण्यात आला आणि त्यानंतर त्याच्या खात्यातील संपूर्ण रक्कम हडप करण्यात आली. या प्रकरणी बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात घडल्याची माहिती आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; कोर्टाने आरोपीला सुनावली ‘ही’ शिक्षा

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मोबाईलवर स्काईप ॲप्लिकेशन वापरतात. या स्काईप ॲपवर त्यांना 2 सप्टेंबर 2024 रोजी एकाने संपर्क करून आपण दिल्ली केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआय मधून बोलत असल्याचे सायबर चोरट्यांनी भासवले. या चोरट्यांनी फिर्यादी यांना त्यांच्या नावावर दिल्लीत अनेक खटले दाखल असल्याची धमकी दिली. तसेच सीबीआय अधिकारी तुमचा शोध घेत असल्याची सुद्धा बतावणी केली. यावर न थांबता या सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांचा आधार कार्ड नंबर विचारून त्यांच्या आधार कार्डच्या नावावर 50 खटले असल्याचं सांगितलं. यावर फिर्यादी यांनी माझ्यावर कुठले ही खटले नसल्याचे सांगितल्यानंतर सायबर चोरट्यांनी त्याची शहानिशा करण्यासाठी फिर्यादी यांना बँक खात्याचे नंबर देण्यास सांगितले.

बँक खात्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर चोरट्यांनी फिर्यादी यांना बँकेतील रक्कम दुसऱ्या खात्यावर ट्रान्स्फर करण्यासाठी सांगितली. सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे वाटून फिर्यादी यांनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर 42 लाख 95 हजार 637 रुपये ट्रान्स्फर केले. बँक खात्यातील सर्व रक्कम गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी स्काईप धारकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्यांच्याकडून कुठले ही उत्तर आलं नाही. बाणेर पोलिस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mulshi Crime News: धक्कादायक! मुळशी येथील मंदिरातील अन्नपूर्णा देवीच्या मुर्तीची विटंबना; दोघांना अटक

Web Title: Pune youth cyber fraud of rs 42 lakhs by pretending to be a cbi officer called via skype app

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 09:35 AM

Topics:  

  • crime
  • cyber crime
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट
2

पूनम निघाली चंदन…! ‘आज नको ना…’ म्हणत 3 वर्ष संबंध टाळत राहिली; दाढी करताना उघड झाले रहस्य, वादाचा झाला रक्तरंजित शेवट

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत
3

Ambernath Crime: प्रेमसंबंधाच्या संशयातून अमानुष मारहाण आणि अखेर तरुणाचा मृत्यू; पाच आरोपी अटकेत

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?
4

Ketan Agrawal Muder Case: सियाच्या घरातून पुरावे जप्त; पोलिसांची संशयाची सुई आता नेमकी कोणाकडे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.