रणजित कासलेला कोर्टाचा दणका; तब्बल 'इतक्या' दिवसांची सुनावली कोठडी
वर्धा : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या गजानन नामक आरोपीला दोषी ठरवून दंडासह मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा निकाल वर्धा येथील जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी शनिवारी (दि.3) दिला. संबंधित प्रकरणातील आरोपी गजानन याला विविध कलमांतर्गत 3 वर्षांचा सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त 6 महिन्यांचा कारावासाची शिक्षा सुनावली.
पीडितेला नुकसान भरपाई म्हणून दंडाच्या रकमेतून 15 हजार रुपये देण्याचे आदेशित केले आहे. तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे काही कलमांप्रमाणे भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. पीडितेची आई मयत असल्याने ती तिच्या वडील व आजीसोबत तिच्या आत्याच्या घरासमोर राहत होती. 25 ऑगस्ट 2023 ला पीडितेच्या आत्याला गावातील आशा स्वयंसेविकेने तिला घरी बोलावले. तेथे ती व तिच्या भावांच्या परिवारसह गेली असता आशा स्वयंसेविकेने पीडिता ही चार महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यानंतर पीडितेला विश्वासात घेत विचारपूस करण्यात आली.
याच विचारपूस दरम्यान घरासमोर राहणाऱ्या आरोपीने तिच्यावर 8 ऑक्टोबर 2022 ला बळजबरी केल्याचे पुढे आले. शिवाय वारंवार पीडितेवर बलात्कार करून तिला गर्भवती केल्याचे आणि घटनेची माहिती कुणाला सांगितल्यास जीवानिशी ठार करण्याची धमकी आरोपीने पीडिलेला दिल्याचेही पुढे आले. त्यानंतर सेलू पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदविण्यात आली. तक्रारीची दखल घेत सेलू पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली.
शिक्रापुरात तरुणीवर अत्याचार
राज्यात गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. असाच एक प्रकार पुण्याच्या शिरूरध्ये घडला होता. शिरुर येथील योगेश धनवडे याची पुण्यातील एका युवतीशी ओळख झाली. त्यानंतर योगेश याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवून युवतीला वारंवार स्वतःच्या घरी बोलावले. तसेच हॉटेलवर बोलावून युवतीवर जबरदस्तीने वारंवार अत्याचार केल्यानंतर युवतीने लग्नाबाबत विचारणा केली.