तानिया सचदेव(फोटो-सोशल मीडिया)
Tania Sachdev wins WG Masters : सध्या सोशल मीडियावर बुद्धिबळ चाहत्यांमध्ये तानिया सचदेवचे नाव चर्चेत आले आहे. महिला ग्रँडमास्टर तानिया सचदेवने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान ताठ होईल अशी कामगिरी केली आहे. सचदेवने यापूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये भारतासाठी अनेकवेळा भाग घेऊन अनेक पदके जिंकली देखील आहेत. त्यानंतर आता तिने महिला ग्रँड मास्टर्स ही पदवी देखील जिंकली आहे. तानिया सचदेव या खेळाडूला ‘ब्युटी विथ ब्रेन’ म्हणून देखील संबोधले जाते.
हेही वाचा : Asia Cup Hockey 2025 :पाकिस्तान अधिकृतपणे बाहेर; ओमानचीही स्पर्धेतून माघार, ‘या’ दोन संघांची झाली एंट्री..
तानियाला बुद्धिबळाची ‘ग्लॅमर गर्ल’ म्हणून देखील परिचित आहे. २० ऑगस्ट १९८६ रोजी दिल्ली येथे जन्मलेल्या तानिया अवघ्या सहा वर्षांची होती जेव्हा तिने या खेळामध्ये आपली रुचि दाखवून यातील युक्त्या शिकण्यास सुरुवात केली होती. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकून तानियाने इतिहास रचला होता.
लहान वयातच तानियाने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घुएन आपली क्षमता दाखवून दिली होती. तिने १२ वर्षांखालील गटात जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. तर २००२ मध्ये आशियाई ज्युनियर गर्ल्स चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणारी तानिया ही २००५ मध्ये महिला ग्रँडमास्टरचे विजेतेपद जिंकणारी आठवी भारतीय ठरली होती.
यानंतर, तानियाने २००६ आणि २००७ मध्ये राष्ट्रीय महिला प्रीमियर बुद्धिबळ अजिंक्यपदावर आपले नाव कोरले होते. त्याच वर्षी तिने महिला आशियाई बुद्धिबळ अजिंक्यपद देखील आपल्या खिशात टाकले होते. २०१५ मध्ये, तानियाने रेकजाविक ओपनमध्ये सर्वोत्कृष्ट महिला पुरस्कार देखील जिंकून मोठी कामगिरी केली होती. त्याच वर्षी तनीयाने आशियाई कॉन्टिनेंटल महिला रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली होती.
हेही वाचा : Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’ शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी..
तानियाने २०१६, २०१८ आणि २०१९ मध्ये तीन वेळा कॉमनवेल्थ महिला बुद्धिबळ अजिंक्यपदावर आपले नाव कोरले होते. सप्टेंबर २०२४ मध्ये, तानिया ४५ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाडच्या महिला गटात सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या भारतीय संघाचा भाग राहिली आहे. हे भारताचे पहिले ऑलिंपियाड सुवर्णपदक होते. तानियाला मॉडेलिंगची देखील आवड असून ती रॅम्प वॉक व्यतिरिक्त, तिला फोटोशूटचीही आवड आहे.