Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : एक हत्या आणि 64 बलात्कार, हातपाय बांधले अन्…निर्घृण हत्याकांडाचा अखेर उलगडा

जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे 21 एप्रिल 2026 रोजी घडलेल्या 22 वर्षीय तरुणीच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणातील आरोपीला अखेर पाच दिवसांच्या शोधमोहीमेनंतर रायगड पोलिसांनी अटक केली

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 26, 2026 | 04:04 PM
Raigad News :  एक हत्या आणि 64 बलात्कार, हातपाय बांधले अन्…निर्घृण हत्याकांडाचा अखेर उलगडा
Follow Us
Follow Us:
  • एक हत्या आणि 64 बलात्कार, हातपाय बांधले अन्…
  • निर्घृण हत्याकांडाचा अखेर उलगडा
रायगड : जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे 21 एप्रिल 2026 रोजी घडलेल्या 22 वर्षीय तरुणीच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणातील आरोपीला अखेर पाच दिवसांच्या शोधमोहीमेनंतर रायगड पोलिसांनी अटक केली असून, आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 30 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेत पल्लवी मोरे (वय 22 , रा. वडगाव) हिचा मृतदेह मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये आढळून आला होता.

प्राथमिक तपासात आरोपी अनिस मोहम्मदखान मालदार (वय 38, रा. लांजा जि. रत्नागिरी ) याने तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केल्याचे समोर आले आहे.माहितीनुसार, आरोपीने तरुणीचे हात-पाय बांधून कोयत्याने वार करत हत्या केली. फॉरेन्सिक अहवालानुसार मृत्यूपूर्वी तरुणीला अमानुष शारीरिक छळ सहन करावा लागल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच हा आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगून आल्याची माहिती समोर येत आहे.

या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 103 (1) (हत्या) व 64 (बलात्कार) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित तरुणी अनुसूचित जातीतील असल्याने तपास उपविभागीय पोलीस अधिकारी काळे यांच्याकडून केला जात आहे.दरम्यान, हा गुन्हा पूर्वनियोजित असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीने गुन्ह्यापूर्वी तयारी केली होती तसेच गुन्ह्यानंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचे तपासात उघड झाले आहे.या घटनेनंतर माणगाव, गोरेगाव व परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिक, व्यापारी आणि विविध संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. 25 एप्रिल रोजी या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला होता. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

24 तासांत घरफोडीचा गुन्हा उघड, महिलेला ठोकल्या बेड्या; लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त

दरम्यान, राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे आश्वासन दिले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व लॉज व हॉटेल्सची तपासणी मोहीम हाती घेतली असून नोंदणी पुस्तके व सीसीटीव्ही यंत्रणांची काटेकोर पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या भीषण घटनेमुळे ग्रामीण भागातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

व्यवसायासाठी सावकाराकडून कर्ज घेणं पडलं महागात; कोऱ्या चेकवर जबरदस्तीने सह्या घेतल्या अन्…

Web Title: Raigad news one murder and 64 rapes tied hands and feet andthe brutal murder case is finally solved

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित
1

Anil Kapoor: “दोन मुली म्हणजे दुप्पट बोनस!” अनिल कपूर यांनी सांगितलं आपल्या यशाचं गुपित

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज
2

Ambani Ganpati Celebration Fashion: अंबानींच्या गणपती सोहळ्यातील लुक्सवर फिदा? कमी खर्चात मिळवा तसाच स्टाइलिश अंदाज

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती
3

Ganesh Festival : शिक्षणातील गैरप्रकारांवर बाप्पाच्या देखाव्यातून प्रहार; ‘NEET पेपरफुटी’वर नेतिवलीच्या राजाकडून जनजागृती

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल
4

Viral Video: निषेधासाठी थेट पालिका कार्यालयात कुत्र्यांची ‘Entry’; निफाडमधील व्हिडिओ व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.