Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!

शनिवारी कुटुंबीयांना फोन करून तो रायगडाच्या टकमक टोकावर असल्याचे सांगतो आणि काही वेळातच त्याचा मोबाईल बंद होतो. रात्रभर शोधमोहीम राबवल्यानंतर रविवारी ड्रोनच्या मदतीने शोध घेतला असता ८०० फूट खोल दरीत त्याचा मृतदेह आढळून आला; आता तो सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे मोठे आव्हान बचाव पथकासमोर आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 04, 2026 | 01:09 PM
Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!

Raigad News: रायगडच्या टकमक टोकावरून युवक बेपत्ता; ड्रोनने शोध घेतला अन् ८०० फूट खोल दरीत दिसला मृतदेह!

Follow Us
Follow Us:
  • टकमक टोकाखाली ८०० फूट खोल दरीत सुयोगचा मृतदेह आढळला
  • ड्रोनच्या मदतीने बचाव पथकाला मिळाला मृतदेहाचा ठाव
  • घनदाट झाडी आणि तीव्र उतारामुळे मृतदेह बाहेर काढण्याचे आव्हान
 

रायगड : किल्ले रायगडावरील टकमक टोकावरून उडी घेतल्याचा संशय असलेल्या ३७ वर्षीय युवकाचा मृतदेह अखेर बचाव पथकाला शोधण्यात यश आले आहे. टकमक टोकाखाली निजामपूरच्या बाजूला सुमारे ८०० फूट खोल दरीत हा मृतदेह आढळून आला. प्रतिकूल वातावरण, दाट धुके, घनदाट झाडी आणि अत्यंत तीव्र उतार अशा आव्हानात्मक परिस्थितीत बचाव पथकाने शोधमोहीम राबवली. सध्या मृतदेह दरीतून सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

हेही वाचा: Crime News: दारूविक्रीविरोधात तक्रार केली अन् वारकऱ्याला बेदम मारहाण; पाय फ्रॅक्चर, भीतीपोटी गाव सोडण्याची वेळ!

घरी फोन केल्यानंतर मोबाईल बंद

मिळालेल्या माहितीनुसार, सुयोग पांचाळ शनिवारी किल्ले रायगडावर आला होता. त्यानंतर त्याने घरी फोन करून आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे सांगितले. या फोननंतर काही वेळातच त्याचा मोबाईल बंद झाला. त्याच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय चिंतेत पडले आणि त्यांनी तातडीने रायगडाच्या पायथ्याशी धाव घेतली. पायथ्याशी सुयोगची दुचाकी आढळून आली. मात्र, सुयोगचा ठावठिकाणा लागत नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली.

रात्री शोधमोहीम थांबवली

घटनेची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस, स्थानिक नागरिक आणि आपत्कालीन बचाव पथक रायगडावर दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, प्रचंड अंधार, दाट धुके आणि टकमक टोकाखालील अत्यंत धोकादायक दरी यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव रात्री शोधकार्य थांबवण्यात आले.

हेही वाचा: Accident News: दुचाकीवरून चौघे निघाले होते घरी; पाठीमागून ट्रेलर आला अन् पती-पत्नीसह चिमुकल्याचा मृत्यू

ड्रोनच्या मदतीने मृतदेहाचा शोध

रविवारी सकाळी उजाडताच बचाव पथकाने पुन्हा शोधमोहीम सुरू केली. दरीचा मोठा विस्तार आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेण्यात आली. ड्रोनच्या माध्यमातून शोध घेत असताना निजामपूरच्या दिशेला सुमारे ८०० फूट खोल दरीत सुयोगचा मृतदेह आढळून आला.

मृतदेह बाहेर काढण्याचे आव्हान

मृतदेहाचा ठाव लागला असला तरी तो दरीतून वर आणणे हे बचाव पथकासमोर मोठे आव्हान आहे. मृतदेह आढळलेल्या ठिकाणी घनदाट झाडी, तीव्र उतार आणि खोल दरी असल्याने बचावकार्य अत्यंत जोखमीचे आहे. सध्या रेस्क्यू टीम दरीत उतरून मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. सुयोगने टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या घटनेमागील कारणाचा तपास करत आहेत.

Web Title: Raigad takmak tok suyog panchal body found 800 feet deep valley

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 01:09 PM

Topics:  

  • Death Case
  • Fort Raigad
  • maharashtra news
  • Raigad Accident
  • Raigad News

संबंधित बातम्या

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा
1

Jalgaon News: शिकार चार, पण बिबट्या बेपत्ता! अमळनेरमध्ये वनविभागाला ‘खो’ देणाऱ्या बिबट्याची चर्चा

Jalgaon News: यावलकरांसाठी मोठी बातमी! ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर, ५० टक्के काम पूर्ण
2

Jalgaon News: यावलकरांसाठी मोठी बातमी! ५६ कोटींची पाणीपुरवठा योजना प्रगतीपथावर, ५० टक्के काम पूर्ण

Crime News: डॉक्टरांनी सांगितले ‘तातडीने सिझेरियन करा’… उपचार रखडले अन् ९ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचाही…
3

Crime News: डॉक्टरांनी सांगितले ‘तातडीने सिझेरियन करा’… उपचार रखडले अन् ९ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचाही…

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत
4

Accident News: पहिल्यांदाच हट्ट केला अन् काळाने हिरावून नेले; दिवेआगरच्या समुद्रात सुमितचा दुर्दैवी अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.